प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे टेन्शन असते. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात. ज्यामुळे अनेकजण नैराश्यासारख्या गोष्टीचा सामना करतात. सुपरमॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमणची (Milind Soman) पत्नी अंकिता कोंवर (Ankita Konwar) ही नैराश्याशी झुंज देत आहे. तिने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर याचा खुलासा केला आहे. फोटो पोस्ट करून अंकिताने हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की, फोटोमध्ये ती हसताना दिसत असली तरी तिची प्रकृती ठीक नाही.
अंकिताने तिचा ड्रिंक करतानाचा एक फोटो पोस्ट केला आणि त्यासोबत लिहिले की, “अलिकडच्या दिवसातील एक फोटो, एके दिवशी माझ्या डोक्यात वादळ निर्माण झाले होते, पण माझ्या चेहऱ्यावर हसू आणून मी शांत होते. होय, माझ्याकडे अजूनही काही दिवस आहेत जिथे सर्व काही ‘ठीक’ नाही. प्रत्येकजण जो चांगला दिसतो तो खरोखर चांगला नसतो.”
अंकिताने लिहिले की, ”काही गोष्टी एकाच वेळी जड आणि निरर्थक वाटतात पण मला आता पूर्वीसारखी भीती वाटत नाही. चिंतेत आणि नैराश्यात दीर्घ काळ जगल्यानंतरही, मला अजूनही काळे ठिपके जाणवत आहेत. जेव्हा मला अंधाराचा सामना करावा लागतो तेव्हा मी रडते, मी माझे विचार पूर्वीसारखे धरत नाही.”
अंकिताने पुढे लिहिले की, “पण आता मी अधिक मजबूत, अधिक सकारात्मक झाली आहे आणि मला अंधाऱ्या पट्ट्यांमधून प्रकाश दिसू लागला आहे. आपल्यापैकी काहींना या जगात टिकून राहण्यासाठी बाकीच्यांपेक्षा थोडे जास्त प्रयत्न करावे लागतात. हे कोणासाठीही सोपे नसते, तुम्ही फक्त चांगले आणि मजबूत व्हा. ”
अंकिता आणि मिलिंद सोमण यांच्या लग्नाला तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे, तर त्यांच्या नात्याला ७ वर्षे झाली आहेत. अनेक वर्षांच्या नात्यानंतरही दोघांमधील प्रेम नजरेसमोर येते. दोघेही एकमेकांबद्दलच्या रोमँटिक पोस्ट शेअर करायला विसरत नाहीत. पण अनेकदा हे जोडपे वयाच्या अंतरामुळे ट्रोलर्सचे लक्ष्य बनते.
हेही वाचा-
अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा झाला अपघात; लोकांनी पकडली ड्रायव्हरची कॉलर मग पुढे…
धर्मेंद्र यांनी मुलगा बॉबीचा फोटो केला शेअर, नंतर मागितली सर्वांची माफी; पण का?
अंधारात टॉर्च लावून ईशा गुप्ताने दिल्या ‘अशा’ पोझ, बाथरूममधील व्हिडिओ आला समोर