अभिनेत्री नोरा फतेहीच्या कारचा झाला अपघात; लोकांनी पकडली ड्रायव्हरची कॉलर मग पुढे…


बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘दिलबर गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी नोरा फतेही (Nora Fatehi) या अभिनेत्रीची प्रचंड मोठी फॅन फोलिविंग आहे. ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तिच्या संबंधित कोणतीही माहिती जाणून घेण्यास चाहते उत्सुक असतात. मात्र तिच्या चाहत्यांसाठी आता एक वाईट बातमी समोर आली आहे. नोराच्या गाडीचा मंगळवारी (२१ डिसेंबर) संध्याकाळी अपघात झाला आहे. गुरु रंधावा (Guru Randhawa) याच्यासोबत तिच्या नवीन गाण्याच्या लाँचिंगशी संबंधित कार्यक्रमात अभिनेत्रीने हजेरी लावली होती. यावेळी नोराच्या ड्रायवरने एका रिक्षाला धडक दिली. मात्र अपघात झाला तेव्हा नोरा कारमध्ये उपस्थित नव्हती, अशी माहिती समोर आली आहे.

लोकांनी घेरले नोराच्या ड्रायव्हरला
माध्यमांतील वृत्तानुसार, जेव्हा नोराच्या ड्रायव्हरने रिक्षाला धडक दिली, तेव्हा लोक रस्त्यावर त्याची कॉलर ओढताना दिसले. जेव्हा अभिनेत्रीच्या ड्रायव्हरने रिक्षावाल्याला १००० रुपये दिले तेव्हा तिला तेथून जाण्याची परवानगी देण्यात आली.

नोरा सध्या तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘डान्स मेरी रानी’ या गाण्यासाठी चर्चेत आहे. गाण्यातील तिच्या लूकबद्दल नोरा म्हणाली, “मोठी झाल्यावर मला सुंदर आफ्रिकन महिलांनी वेढले आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य असोत, माझे मित्र असोत, आफ्रिकन लोकांसारखे सुंदर कुरळे केस असलेली माझी आई असो.”

‘डान्स मेरी रानी’साठी चर्चेत आहे नोरा फतेही
ती पुढे म्हणाली की, “आफ्रिकेत विविध त्वचेच्या टोनपासून केसांच्या वेगवेगळ्या रचनेच्या सौंदर्यात बरीच विविधता आहे. मला नेहमीच कलाकार म्हणून ते सेलिब्रेट करायचे होते. गेल्या अनेक वर्षांपासून, मी आंतरराष्ट्रीय कलाकारांना आफ्रिकन फॅशन आणि डान्सचे सुंदर प्रतिनिधित्व करताना पाहत आली आहे.”

नोरालाही असेच काहीतरी करण्याची इच्छा होती. ती म्हणते की, “माझ्यामधील एका आफ्रिकनला तिच्या कलेतून आफ्रो सौंदर्य आणि आफ्रिकन डान्स मोठ्या प्रमाणावर साजरे करायचे होते! ‘डान्स मेरी रानी’सोबत मला ही संधी मिळाली.”

मनी लाँड्रिंग प्रकरणात आले होते नाव
डान्स मूव्ह्सशिवाय, नोरा २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात ईडीच्या रडारखाली आल्यापासून चर्चेत आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कार, हिरे आणि बॅग अशा महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. नोरा फतेही अखेरची अजय देवगण आणि संजय दत्तसोबत ‘भुज: द प्राइड ऑफ इंडिया’ या चित्रपटात दिसली होती.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!