धर्मेंद्र यांनी मुलगा बॉबीचा फोटो केला शेअर, नंतर मागितली सर्वांची माफी; पण का?


बॉलिवूडमध्ये हिमॅन या नावाने प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र (Dharmendra) सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते आपल्या जुन्या आठवणींसह फार्म हाऊसचे व्हिडिओ शेअर करत असतात. मुलांबद्दल बोलणे असो किंवा मित्रांसोबतचा कोणताही किस्सा असो, ते अनेकदा ट्वीटद्वारे चाहत्यांपर्यंत पोहोचवतात. अलिकडेच, त्यांनी आपल्या हँडसम मुलाचा बॉबी देओल (Bobby Deol) याचा एक फोटो शेअर केला आहे. हे ट्वीटपर्यंत ठीक होते, पण काही वेळाने त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली.

बॉबी देओलसाठी केले ट्वीट
धर्मेंद्र आपल्या सर्व मुलांवर खूप प्रेम करतात. अलिकडेच त्यांनी त्यांचा धाकटा मुलगा बॉबीचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये बॉबी खूपच सुंदर आणि देखणा दिसत आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “हा चेहरा… स्वतःची काळजी घेत नाही.” (dharmendra share bobby deol appreciation post than apologises)

धर्मेंद्र पुढे लिहितात की, “कधीकधी मी माझ्या सुंदर बॉबीला पटवण्यासाठी असे फोटो पोस्ट करतो, जेणेकरून तो नेहमी स्वतःची काळजी घेईल. मित्रांनो, मला आनंद आहे की, मी अशा सुंदर मुलांचा पिता आहे.” धर्मेंद्र यांच्या या ट्वीटवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.

चाहत्यांची माफी का मागीतली?
कमेंट्समधील चाहत्यांचे प्रेम पाहून धर्मेंद्र यांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि त्यांच्या चित्रपटांचे अनेक व्हिडिओ आणि क्लिपही शेअर केल्या. आपल्या काही पोस्टमध्ये त्यांनी मुलगा सनी देओललाही टॅग केले आहे. एकापाठोपाठ एक ट्वीट करत त्यांनी चाहत्यांची माफीही मागितली. त्यांनी लिहिले की, “आज अनेक ट्वीट एकत्र केले. तुम्हाला बोर केल्याबद्दल सॉरी.”

धर्मेंद्र ६ मुलांचे आहेत वडील
धर्मेंद्र यांचे पहिले लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झाले होते. त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून चार मुले, दोन मुले सनी आणि बॉबी आणि दोन मुली अजिता आणि विजेता आहेत. धर्मेंद्र यांनी हेमा मालिनीसोबत दुसरे लग्न केले. हेमा आणि धर्मेंद्र यांना ईशा आणि अहाना देओल ही दोन मुले आहेत.

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मध्ये दिसणार धर्मेंद्र
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर धर्मेंद्र सध्या करण जोहरच्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटासाठी शूटिंग करत आहेत. या चित्रपटात रणवीर सिंग आणि आलिया भट्ट मुख्य भूमिकेत आहेत. तर शबाना आझमी आणि जया बच्चन देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. बॉबी देओल चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्येही व्यस्त आहे. बॉबी आता नेटफ्लिक्स सीरिज ‘पेंटहाउस’मध्ये दिसणार आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!