‘मिस युनिव्हर्स’ हरनाज सिंधूने केली अभिनेत्री होण्याची इच्छा व्यक्त, युजर्सकडून होतेय ट्रोल


नुकताच मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावावर करणारी हरनाज सिंधू सतत प्रकाशझोतात आहे. २१ वर्षांनी हा ताज जिंकणारी हरनाज तिसरी भारतीय महिला ठरली. हरनाजने हा ‘किताब जिंकत देशाचे नाव रोशन केले आहे. नुकताच हरनाजने एका मुलाखतीमध्ये तिच्या भविष्यातील योजनांबद्दल सांगितले. या मुलाखतीवरून तिला आता ट्रोल करण्यात येत आहेत.

हरनाजने तिच्या मुलाखतीमध्ये तिची इच्छा व्यक्त करत सांगितले की, तिला सामान्य अभिनेत्री नाही तर प्रभावशाली अभिनेत्री व्हायचे आहे. जी मजबूत पात्रांची निवड करत, अशा रूढींना मात देईल ज्या स्त्री काय आहे? आणि काय करू शकता हे दाखवू शकतील. शिवाय तिला तिच्या अभिनयाने लोकांना प्रेरित करायचे आहे.

हरनाजने तिच्या मुलखातीमध्ये म्हटले की, “मी एक सामान्य नाही तर प्रभावशाली अभिनेत्री बनू इच्छिते. जी अतिशय दमदार भूमिकांची निवड करत स्त्रिया काय आहेत आणि काय करू शकतात हे दाखवू शकते. यासोबतच मी माझ्या अभिनयाने लोकांना प्रेरित करू इच्छिते.”

हरनाजच्या या व्यक्तव्यानंतर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी तिला व्यंग्यात्मक पद्धतीने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एकाने लिहिले, “अभिनेत्री होण्याचा निर्णय चांगला आहे, कदाचित यासाठीच तू मिस युनिव्हर्स होण्याचा रस्ता निवडला.” दुसऱ्याने लिहिले, “तुझ्यावर सतत करण जोहर आणि अनुराग कश्यप सारख्या भुतांची सावली फिरत राहो.” तर अजून एका युजरने लिहिले, “सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या देशातील सर्व सुंदरी फक्त स्टेजवरच का समाजात बदलाव आणण्याचे बोलतात? आणि शेवटी करण जोहरच्या चित्रपटांमध्ये डान्स करताना दिसतात.”

एकाने लिहिले, “जग विचार करते की, मिस युनिव्हर्स मानवाची कारणं समोर ठेवत जगात सकारत्मक बदलाव आणण्यासाठी काम करतात. मात्र नंतर फक्त पैसा पैसा करतात.” तर अजून एक लिहितो, “हे ऐकून बॉलिवूडमध्ये आनंदाची लाट आली असेल की, नवीन चिमणी येणार.” एकाने लिहिले की, “सौंदर्यवती झाल्यानंतर सर्वच का अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघतात. अभिनेत्री होण्यापेक्षा सामाजिक कार्यकर्ता होण्याचा विचार का नाही करत.” तसे पाहिले तर हरनाजने या स्पर्धेत भाग घेण्याआधीच एका मालिकेमध्ये काम केले आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!