Friday, April 25, 2025
Home बॉलीवूड व्हिडिओ: ‘डोन्ट रश’ गाण्यावर थिरकली मिथुन चक्रवर्ती यांची सून, सोबतच सहकलाकारांनीही धरला ठेका

व्हिडिओ: ‘डोन्ट रश’ गाण्यावर थिरकली मिथुन चक्रवर्ती यांची सून, सोबतच सहकलाकारांनीही धरला ठेका

मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा आजकाल टीव्ही शो ‘अनुपमा’मध्ये काव्याच्या भूमिकेत धमाल करत आहे. तसेच, अभिनेत्री सोशल मीडियावर तिच्या डान्सचे व्हिडिओ आणि ग्लॅमरस फोटो शेअर करुन चर्चेचा विषयही बनत असते. मदालसाने सोशल मीडियावर पुन्हा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती ‘डोन्ट रश’ या लोकप्रिय इंग्रजी गाण्यावर डान्स मुव्हज दाखवत आहे. मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्माच्या या डान्स व्हिडिओला चाहत्यांकडून पसंती मिळत असून जोरदार व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, मदालसा टीव्ही शो ‘अनुपमा’ च्या सहकलाकारांसोबत नाचत आहे. यावेळी तिने लाल रंगाची साडी परिधान केली होती. मदालसाचा हा डान्स व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला आहे. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत 1 लाख 28 हजारांहून अधिक वेळा पाहिले गेले आहे. तिने हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.

मदालसा शर्मा या दिवसात ‘अनुपमा’ या टीव्ही शोमध्ये काव्या झवेरीची भूमिका साकारत आहे. तिने मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले आहे. मदालसा एक अतिशय प्रसिद्ध अभिनेत्री आहे. याव्यितिरिक्त ती तेलुगु चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आहे.

मदालसा प्रसिद्ध अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माता-दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. 90 च्या दशकात महाभारतात शीला यांनी देवकीची भूमिका साकारली होती. 2009 मध्ये मदालसा ‘फिटिंग’ या तेलुगु चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. याशिवाय तिने ‘शौर्य’ या कन्नड चित्रपटातही काम केले आहे. याशिवाय, मदालसा सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-दिपीका-रणवीरच्या रोमान्सच्या व्हिडीओची इंटरनेटवर एकच चर्चा, सोशल मीडियावर शेअर केलाय व्हिडीओ

-रश्मिका आणि कार्ती यांच्या बहूचर्चित चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, प्रेक्षक सिनेमाच्या प्रतीक्षेत

-भोजपुरी स्टार राकेश मिश्राने केला अक्षरा सिंगसोबतचा ‘थ्रोबॅक’ फोटो शेअर, सोशल मीडियावर होतोय जोरदार व्हायरल

हे देखील वाचा