Friday, July 12, 2024

‘टिप टिप बरसा’ गाण्यात अक्षय कुमारसह काम करायला तयार नव्हती रवीना, दिग्दर्शकानेच लढवली ‘ही’ युक्ती

साल 1994 मध्ये बॉलिवूड चित्रपट ‘मोहरा’ प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या कथेसोबतच याची गाणीही प्रेक्षकांना खूप आवडली. ज्याच्या जोरावर ‘मोहरा’चे ‘टिप टिप बरसा पानी’ हे गाणे आजही चाहत्यांच्या जिभेवर सहज येते. पण तुम्हाला माहीत आहे का, की ‘मोहरा’ची अभिनेत्री रवीना टंडन (Ranveena Tandon) तिचा सहकलाकार अक्षय कुमारसोबत (Akshay Kumar) ‘ये टिप टिप बरसा पानी’ गाण्यासाठी तयार नव्हती. ‘मोहरा’चे प्रोडक्शन डिझायनर आणि प्रोड्यूसर शब्बीर बॉक्सवाला यांनी नुकताच हा खुलासा केला आहे. 

रवीनाला वाटत होती ‘याची’ भीती
नुकत्याच एका मीडिया मुलाखतीदरम्यान शब्बीर बॉक्सवालाने मोहरा चित्रपटातील ‘टिप टिप बरसा पानी’ या सुपरहिट गाण्यामागील मनोरंजक कथा सांगितली आहे. शब्बीरच्या म्हणण्यानुसार, रवीना टंडन अक्षय कुमारसोबत ‘टिप टिप बरसा पानी’ गाणे शूट करण्यासाठी अजिबात तयार नव्हती. रवीनाला वाटत होते की, हे रोमँटिक गाणे पाहिल्यानंतर तिच्या वडिलांवर याचा काय परिणाम होईल आणि ती त्यामुळे सतत अस्वस्थ होती. पण नंतर ‘मोहरा’चे दिग्दर्शक राजीव राय यांनी रवीनाला चांगले समजावून सांगितले आणि सांगितले की, हे गाणे पाहिल्यानंतर तुझे करिअर उंचीवर पोहोचेल. मग घडले असे की, रवीनाचे ‘टिप टिप बरसा पानी’ 28 वर्षांनंतरही सुपरहिट आहे. (mohra producer shabbir boxwala reveals inside facts about raveena tandon)

‘मोहरा’साठी पहिली पसंती नव्हती रवीना
शब्बीर बॉक्सवाला यांनी असेही सांगितले की, दिवंगत अभिनेत्री दिव्या भारती (Divya Bharti) ही खरोखरच दिग्दर्शक राजीव राय यांची मोहरा चित्रपटासाठी पहिली पसंती होती. परंतु तिच्या अचानक झालेल्या निधनानंतर राजीवचे लक्ष रवीनाकडे गेले आणि त्यानंतर तिला चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी कास्ट करण्यात आले. रवीना टंडन आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज परेश रावल (Paresh Rawal), सुनील शेट्टी (Suniel Shetty) आणि नसिरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) महत्त्वाच्या भूमिकेत होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
का राहिली अक्षय कुमार आणि रवीना यांची प्रेम कहाणी अपूर्ण?
२१व्या वर्षीच घेतला सिंगल मदर होण्याचा निर्णय, ‘असा’ रोचक आहे रवीना टंडनचा सिनेसृष्टीतील प्रवास

हे देखील वाचा