अरबी गाण्यावर लगावले अभिनेत्री मोनालिसाने जोरदार ठुमके, व्हिडिओ झाला व्हायरल

सध्याच्या सोशल मीडियाच्या काळात कलाकार आणि त्यांचे फॅन्स यांच्यातील संपर्काचे मुख्य साधन म्हणून सोशल मीडिया हे माध्यम मोठ्या प्रमाणावर पुढे आले आहे. फॅन्स आणि कलाकार यांच्यातील दुवा म्हणून सोशल मीडिया काम करते. याच माध्यमातून कलाकारांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता, प्रसिद्धी आणि पब्लिसिटी मिळते. या सोशल मीडियावर सक्रिय राहण्यासाठी कलाकार सतत काही ना काही पोस्ट करत असतात. यात त्यांचे फोटो, व्हिडिओ, रिल्स आदी अनेक गोष्टी ते पोस्ट करतात. सध्याच्या घडीला जवळपास सर्वच कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असून, गाजताना दिसतात. अशीच एक सोशल मीडिया सेन्सेशन असलेली अभिनेत्री म्हणजे मोनालिसा.

भोजपुरी इंडस्ट्रीमधील अतिशय लोकप्रिय बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून मोनालिसा ओळखली जाते. तिने स्वतःच्या बळावर या क्षेत्रात येत यश संपादन केले आहे. सध्या मोनालिसा फक्त भोजपुरी इंडस्ट्रीपूर्ती मर्यादित न राहता संपूर्ण देशात ओळखली जाते. बिग बॉसची स्पर्धक असलेल्या मोनालिसाने भोजपुरीसोबतच हिंदी आणि बंगाली भाषांमध्ये देखील काम केले आहे. सध्या मोनालिसाच्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by MONALISA (@aslimonalisa)

या व्हिडिओमध्ये ती ‘बलम पिता पिता दे’ गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमधील तिचा डान्स आणि तिच्या अदा सर्वानाच घायाळ करताना दिसत असून व्हिडिओमधील तिचा लूक देखील सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओमध्ये तिने ऑरेंज क्रॉप टॉप आणि व्हाईट शॉर्ट्स घातली असून, तिने केस मोकळे सोडले आहेत. अतिशय बिनधास्त आणि लक्षवेधी डान्स स्टेप्स करणाऱ्या मोनालिसाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.

मोनालिसाच्या हा डान्स व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, फॅन्स त्यावर कमेंट्स करत तिच्या लूकचे आणि डान्सचे कौतुक करताना थकत नाहीये. मोनालिसा भोजपुरीमधील टॉप अभिनेत्रींमध्ये सामील असून, तिच्या फॅन फॉलोविंगमध्ये सतत वाढ होताना दिसत आहे. नुकतेच मोनालिसाच्या इंस्टाग्रामवर ५ मिलियन फॅन्स पूर्ण झाले असून, याचे तिचे जोरदार सेलिब्रेशन केले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post