Bye Bye 2021: ‘या’ बॉलिवूड कलाकारांसाठी २०२१ ठरले वाईट वर्ष, नामांकित अभिनेत्रींचाही आहे समावेश


साल २०२१ हे आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. आता नवीन वर्षाची नवी सुरुवात होणार आहे. हे वर्ष अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींसाठी खास ठरलं आहे, तर अनेक सलेब्रिटींसाठी खराब ठरलं आहे. २०२१ मध्ये अनेक कलाकारांची नावे चर्चेमध्ये आली. आर्यन खान, राज कुंद्रा अशा अनेक कलाकारांची नावे या यादीमध्ये आहेत. तर जाणून घेऊ, यावर्षी कोणते कोणते कलाकार वादाच्या भोवऱ्यात अडकले.

राज कुंद्रा (Raj Kundra)
नामांकित अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यावर्षी वादाच्या भोवऱ्यामधे अडकला. राज कुंद्रा हा बिजनेसमॅन आहे, मात्र त्याच्यावर अश्लील व्हिडिओ बनवून एका ऍपद्वारे त्याचा व्यवसाय केल्याचा आरोप केला होता. यासाठी त्याला मुंबई क्राईमब्रांचद्वारे अटक देखील करण्यात आली होती. या प्रकरणामुळे राज कुंद्रा दोन महीने जेलमध्ये होता. या प्रकरणामुळे शिल्पा व तिच्या कूटुंबाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. (most controversial celebrities in 2021)

 आर्यन खान (Aryan Khan)
अभिनेता शाहरुख खानसाठी हे वर्ष कठीण ठरले. त्याचा मोठा मुलगा आर्यन खान याला मुंबई क्रुज अं’मली पदार्थ प्रकरणामध्ये नार्कोटिक्स ब्युरोद्वारे अटक करण्यात आली. या प्रकरणामुळे आर्यनला काही दिवस जेलमध्ये राहावे लागले. या प्रकरणामध्ये आर्यनसोबत अरबाज मर्चंट व मुनमुन धमेचा यांचीही नाव होती.

जॅकलिन फर्नांडिस (Jacquline Fernandez)
बॉलिवूडची नामांकित अभिनेत्री जॅकलिनसाठी हे वर्ष धोक्याचं ठरलं आहे. तिचं नाव २०० करोडच्या मनी लॉड्रिंग प्रकरणामध्ये आले असून, तिचं नाव सुकेश चंद्रशेखरसोबत जोडलं गेलं आहे. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, सुकेशने तिला ९ लाखांची मांजर सुद्धा गिफ्ट केली आहे.

अनन्या पांडे (Ananya Panday)
नवोदित अभिनेत्री अनन्या पांडेही यावर्षी चर्चेमध्ये राहिली. आर्यन खान प्रकरणाच्या तपासामध्ये अनन्या पांडेचं नाव समोर आलं. या प्रकरणातील व्हॉटस ऍप चॅट समोर आले, ज्यामध्ये अनन्याचं देखील नाव समोर आलं होतं. यामुळे अनन्याची एनसीबीद्वारे चौकशी देखील केली गेली.

नोरा फतेही (Nora Fatehi)
नॅशनल क्रश नोरा फतेही सुद्धा यावर्षी चर्चेमध्ये राहिली. सुकेश चंद्रशेखरसोबत असलेल्या तिच्या संबधामुळे तिला अनेक वादाला तोंड द्यावे लागले. सुकेशचे व नोराचे व्हॅटस ऍप चॅट समोर आले, ज्यामध्ये महागड्या कारबद्दल बोलल्याचे म्हटले गेले आहे.

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan)
साल २०१६ पनामा पेपर्स प्रकरणामध्ये प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन हिला ईडीने समन्स बजावले होते. या प्रकरणामध्ये ईडीद्वारे तिची पाच तास चौकशी केली गेली. पनामा पेपर्स प्रकरणामध्ये जगभरातील नेते, व्यावसायिकांची नावे आहेत, ज्यांनी टॅक्स वाचवण्यासाठी नकली कंपनी बनवून परदेशामध्ये पैसे गुंतवले आहेत.

तापसी पन्नू (Taapsee Pannu)
प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नूसाठी हे वर्ष अडचणीचं ठरलं. तापसीसोबत अनुराग कश्यप व विकास बहल यांच्या घरी आयटीने छापा मारला होता. अनियमित टॅक्स प्रकरणात तिचे नाव आले होते. या प्रकरणामध्ये तिची अनेक तास चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणाची तापसीने नंतर ट्वीट करून माहिती ही दिली होती.

कंगना रणौत (Kangana Ranaut)

कायम वादग्रस्त मुद्द्यामुळे चर्चेत असणारी कंगना २०२१ मध्ये पुन्हा वादामध्ये अडकली होती. आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे ती नेहमी नवीन मुद्दे उपस्थित करते. नुकत्याच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये भारताला मिळालेलं स्वतंत्र भीक आहे असे तिने म्हटले. या वक्तव्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले गेले. सेलेब्रिटीपासून ते अनेक नेत्यांद्वारे तिच्यावर टीका केली गेली.

हेही वाचा :


Latest Post

error: Content is protected !!