Wednesday, December 6, 2023

काही अपघात चांगले असतात, ‘त्या’ एका अपघाताने आख्खं आयुष्य बदललं, आज कोटीत कमावतोय पैसा

बॉडी डबल्सचं काम जरा अवघडंच… तुम्हीही म्हणाल, आता ही काय भानगड… तर बॉडी डबल्स म्हणजे एखाद्या कलाकाराच्या जागी दुसऱ्या व्यक्तीने तो सीन शूट करणे. हे काम करणाऱ्या व्यक्तींना पैसा आणि नावही कमीच मिळतं… पण त्यांचं काम जरा जास्तच खतरनाक असतं. हेच काम करायचा साऊथमधला एक व्यक्ती. ज्याला आपण अनेक सिनेमात पाहिलं असेल. पण त्याचं नाव मात्र खूपच कमी लोकांना माहिती असेल. त्यांनी ५०० पेक्षाही अधिक सिनेमात काम केलंय. त्याचं नाव आहे मोटा राजेंद्रन. अशाच एका मल्याळम सिनेमासाठी स्टंट करताना त्यांच्यासोबत एक भयंकर घटना घडली. त्यानंतर त्यांचं आयुष्यच बदललं. मात्र, त्यानंतर त्यांना जी काही प्रसिद्धी मिळाली, तिला सलाम तर ठोकलाच पाहिजे…

राजेंद्रन यांचा जन्म झाला होता १ जून, १९५७ मध्ये. त्यांना ए राजेंद्रन आणि मोटा राजेंद्रन या नावानेही ओळखलं जातं. राजेंद्रन यांना साऊथमध्ये त्यांच्या नावाने तर सोडाच ओ, पण त्यांच्या चेहऱ्यानेच ओळखले जाते. कारणही तसंचय मंडळी… त्यांचा चेहरा हा इतर कलाकारांपेक्षा खूपच वेगळा आहे. विशेष म्हणजे त्यांची बॉडी खूपच बारीक आहे आणि त्यांच्या अंगावर एकही केस नाही. डोक्यावरही नाही, हातापायांवरही नाही आणि छातीवरही नाही. इतकंच नाही, तर त्यांच्या भुवयाही नाहीत. आता तुम्ही म्हणाल की, हे लहानपणापासूनच होतं काय? तर नाही… त्यांचे चांगले केस होते, त्यांच्या चांगल्या मिश्याही होत्या. पण त्यांच्यासोबत असं काही घडलं की, त्यांचं सर्व आयुष्यच बदललं. ( Motta Rajendran lost his hair and facial hair due to an allergy )

त्यांनी करिअरची सुरुवात स्टंटमॅन म्हणून केली होती. पुढे त्यांनी १९९२ साली सिनेसृष्टीत व्हिलनचे बॉडीडबल्स म्हणून काम करू लागले. आपल्या सर्वांनाच माहितीये की, या लोकांचं काम किती भयंकर असतं. ते एका मल्याळम सिनेमासाठी स्टंट करत होते. या स्टंटमध्ये त्यांना जोरात बाईक चावलायची होती, आणि पुढे एका पाण्याने भरलेल्या तलावात बाईकसोबत उडी मारायची होती. हा स्टंट त्यांनी १००% ओकेच दिला. डिरेक्टरला जसा हवा होता अगदी तसाच हा स्टंट झाला. आणि एकाच शॉटमध्ये हा स्टंट परफेक्ट झाला. हीच ती वेळ, ज्यामुळे राजेंद्रन यांच्या आयुष्याला पूर्णपणे बदलले.

खरं तर बाईक घेऊन त्यांनी ज्या पाण्यात उडी मारली होती, त्या पाण्यात आजूबाजूच्या कारखान्यांचं केमिकल सोडलं जायचं. याची माहिती राजेंद्रन यांनाही नव्हतीच, पण सिनेमाच्या संपूर्ण टीमलाही नव्हती. स्टंट शूट केल्यानंतरही राजेंद्रन यांना समजलं नाही की, त्यांच्यासोबत काही झालंय…मात्र, काही वेळाने अंघोळ केल्यानंतर त्यांनी त्यांच्या बॉडीवरील केमिकल काढले होते. इथं त्यांच्याकडून एक चूक झाली. त्यांनी जरा उशीर केला, त्यामुळे जे केमिकल होते, ते सर्व त्यांच्या बॉडी, स्कीनमध्ये गेलं होतं. याचा परिणाम त्यांना शूटिंगच्या एक महिन्यानंतर पाहायला मिळाला. त्यांच्या शरीरावरून सर्व केस गळू लागले.

एवढे तरुण असूनही त्यांच्या शरीरावर एक केसही नव्हता. खरं तर हा आजारच असा होता की, एकदा का केस गेले की, मग परत येतच नाहीत. झालं असं की, ज्या पाण्यात त्यांनी उडी मारली होती, त्या पाण्यामुळे त्यांना एक ऍलर्जी झाली…ज्याला ऍलोपेसिया युनिव्हर्सलिस असे म्हणतात. यामुळे तुमच्या शरीरावरील केस निघून जातात आणि ते केस पुन्हा येत नाहीत.

यानंतर त्यांचा चेहरा वेगळा दिसू लागला. मात्र, त्यांना हे माहिती नव्हते की, हाच चेहरा त्यांना एक मोठा स्टार बनवणार आहे. एकदा एका डिरेक्टरची नजर राजेंद्रनवर पडली. त्यावेळी ते एका सिनेमासाठी स्टंट करत होते. तेव्हाच राजेंद्रन यांना त्यांनी आपल्या सिनेमात एक रोल दिला. यानंतर त्यांना सिनेसृष्टीतून व्हिलनचे अनेक रोल मिळू लागले. कारण, त्यांचं शरीरच असं झालं होतं की, त्यामुळे डिरेक्टर त्यांना दोनच रोलसाठी घेत होते. ते म्हणजे एक तर व्हिलनच्या आणि दुसरे कॉमेडी… विशेष म्हणजे त्यांच्यात टॅलेंट इतकं ठासून भरलं होतं की, ते या दोन्ही रोलमध्ये फीट झाले.

आणि या अपघातानंतर त्यांचं करिअर संपल्यातच जमा आहे, त्यांची बॉडी अशी झालीये, ते काम कसे करतील, असं म्हटलं जात होतं, तेव्हा याच अपघाताने त्यांना नवीन जीवन दिले. जो अभिनेता आतापर्यंत स्टंट करत होता, तो आता व्हिलनचे रोल करू लागला आहे. त्यांच्या या लूकने त्यांना नवीन ओळख मिळवून दिली. आता त्यांना सिनेमात व्हिलन आणि कॉमेडीचे रोल्स मिळू लागले.

राजेंद्र आज साऊथ इंडस्ट्रीचे एक व्यस्त असलेल्या अभिनेत्यांपैकी एक आहेत. त्यांचं वय हे ६४ इतकं असून ते अजूनही काम करत आहेत. त्यांनी आतापर्यंत साऊथच्या ४ भाषांमधील ५०० पेक्षा अधिक सिनेमात काम केले आहे.

( Motta Rajendran lost his hair and facial hair due to an allergy special story in marathi )

अधिक वाचा

HBD I ‘क्या खूब लगती हो!’ सिंपल आणि स्वीट लूकमधील तेजस्विनी पंडितचे आकर्षक फोटो

‘रामायण’मधील ‘सीता’ दीपिका चिखलियाला मॉर्डन अवतारात पाहून भडकले नेटकरी म्हणाले, ‘हातात काय आहे’

अभिनेता करण मेहराने केला पत्नी निशा रावलवर फसवणुकीचा आरोप म्हणाला, ‘ती परपुरुषासोबत राहते’

हे देखील वाचा