Tuesday, June 18, 2024

ठरलं तर! ‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार मौनी रॉय, बॉयफ्रेंडसोबत करणार ‘डेस्टिनेशन वेडिंग’

बॉलिवूडमध्ये सध्या लग्नाचा सीझन सुरू आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. कारण एकामागून एक कलाकार लग्नबंधनात अडकत आहेत, तर काहीजण लग्न करण्याची तयारी करत आहेत. अलीकडेच राजकुमार राव आणि पत्रलेखा यांनी सात फेरे घेऊन त्यांच्या नव्या नात्याची सुरुवात केली. तर काही कलाकारांच्या लग्नाच्या बातम्या प्रचंड चर्चेत आहेत. कॅटरिना कैफ- विकी कौशल, रणबीर कपूर- आलिया भट्ट, आदर जैन- तारा सुतारिया यांच्या लग्नाच्या बातम्याही चर्चेत आहेत. तसेच, कॅटरिना आणि विकी ९ डिसेंबरला लग्न करणार आहेत, असे म्हटले जात आहे.

‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणात मौनी रॉय
बॉलिवूडच नाही, तर टेलिव्हिजन जगतातील कलाकार मंडळीही लग्नाच्या बेडीत अडकत आहेत. अंकिता लोखंडे आणि विकी जैन लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. दरम्यान, टेलिव्हिजनची प्रसिद्ध नागिण मौनी रॉयच्या लग्नाची तारीखही समोर आली आहे. जानेवारीमध्ये मौनीचे लग्न होऊ शकते, असे बोलले जात होते आणि आता लग्नाची तारीखही समोर आली आहे. तसेच तिचा बॉयफ्रेंड सूरज नांबियारसोबत ती कुठे आणि कशी लग्न करणार, याचा खुलासा तिच्या बहिणीने केला आहे. (mouni roy to tie know with boyfriend sooraj nambiar on 27th of january says reports)

मौनी आणि सूरजचे नाव बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. त्याचवेळी मौनीच्या चुलत बहिणीने एका वृत्तवाहिनीला अभिनेत्रीच्या लग्नाच्या तारखेची माहिती दिली आहे. तिने सांगितले की, मौनी आणि सूरज २७ जानेवारीला लग्न करणार आहेत. तसेच हे डेस्टिनेशन वेडिंग असणार आहे.

मौनी रॉयच्या बहिणीचे म्हणणे आहे की, हे लग्न इटली किंवा दुबईत होऊ शकते. यानंतर पश्चिम बंगालमध्ये रिसेप्शन होणार आहे. २७ जानेवारीला लग्न होणार आहे, तर लग्नाच्या दोन दिवस सर्व विधीही पार पडणार आहेत. मात्र, या प्रकरणी मौनी रॉयकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

मौनीच्या बॉयफ्रेंडबद्दल बोलायचे झाले, तर सूरज नांबियार हा व्यवसायाने बँकर आहे आणि तो दुबईत राहतो. अशा परिस्थितीत दोघेही दुबईत लग्न करू शकतात. त्याचवेळी, लग्नानंतर जोडपे एक रिसेप्शन पार्टी देणार आहेत, ज्यामध्ये बॉलिवूड आणि टेलिव्हिजन जगतातील अनेक कलाकार हजेरी लावू शकतात.

मौनीने तिच्या कारकिर्दीची सुरुवात ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’मधून केली होती. त्यानंतर ती ‘कस्तुरी’, ‘देवों के देव महादेव’, ‘नागिन’, ‘नागिन २’, ‘टशन-ए-इश्क’, ‘जुनून’, ‘ऐसी नफरत तो कैसा इश्क’, ‘कृष्णा चली लंडन’, ‘झलक दिखला जा ९’, ‘एक था राजा एक थी रानी’मध्ये दिसली. मात्र, कलर्स टीव्हीवरील ‘नागिन’ या मालिकेत अभिनेत्रीला चांगलीच पसंती मिळाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘मी या चित्रपटासाठी आपले रक्त दिलंय’, म्हणत शाहिदने सांगितला ‘जर्सी’ चित्रपटादरम्यानचा वाईट किस्सा

-नेपोटिझमबाबत आयुष शर्माने मांडले मत; सलमान, शाहरुखचा उल्लेख करत म्हणाला, ‘प्रत्येक अभिनेता स्वार्थी…’

-काय सांगता! जॅकलिन फर्नांडिस आहे २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपीसोबत रिलेशनशिपमध्ये?

हे देखील वाचा