‘तुम हुस्‍न परी, तुम जान-ए-जहां…’, पांढऱ्या ड्रेसमध्ये मौनी रॉय दिसतेय जणू अप्सरा; पाहा अभिनेत्रीचे थ्रोबॅक फोटो

Mouni Roy's throw back photos viral on social media


मौनी रॉय ही बॉलिवूडमधील एक गाजलेली अभिनेत्री आहे. आपल्या चाहत्यांचे मन जिंकण्यात ती कोणतीच कसर सोडत नाही. ती कामातून वेळ काढून सोशल मीडियावर देखील सक्रिय असताना दिसते. तिच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक घटना ती सोशल मीडियावर शेअर करत असते. त्यामुळे ती सर्वत्र खूपच प्रसिद्ध होत असते. तिचा प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर येत्या क्षणीच व्हायरल होत असतो. सध्या सोशल मीडियावर तिचे काही थ्रोबॅक फोटो धुमाकूळ घालताना दिसत आहेत.

मौनी रॉयने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही जुने फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या या फोटोवर तिचे चाहते कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत. तिचे हे फोटो पाहून तुम्ही देखील हे हिंदी गाणे गुनगुनाल, ‘तुम हुस्न परी, तुम जान- ए- जहां, तुम सबसे हसी, तुम सबसे जवां.’

हे फोटो शेअर करून मौनीने तिच्या जुन्या एका ट्रीपच्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यात ती पाण्यात खूप मस्ती करताना दिसत आहे. मौनी रॉयने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. भूमिका कोणतीही असो, ते तिने खूप चांगल्या पद्धतीने साकारली आहे.

मौनी लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत आलिया भट्ट आणि रणबीर कपूर देखील असणार आहेत. या आधी तिची ‘लंडन कॉन्फिडेन्शियल’ ही वेबसीरिज रिलीझ झाली होती. तिच्या या वेब सीरिजला देखील प्रचंड प्रेम मिळाले आहे.

तिने अक्षय कुमारच्या ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मौनीने ‘मेड इन चायना’ या चित्रपटात देखील महत्त्वाची भूमिका निभावली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अमिताभ बच्चन यांच्या बालपणीचे पात्र साकारून नाव कमावणारा ‘हा’ प्रसिद्ध अभिनेता झाला अचानक गायब, आता करतो तरी काय?

-पत्नी आणि मुलींच्या जवळ राहण्यासाठी रणधीर कपूर होणार नवीन घरात शिफ्ट, आपल्या जुन्या घराबाबत उघड केले ‘हे’ गुपीत

-राधे चित्रपटातील किसींग सीनबाबत दिशा पटानीचा मोठा खुलासा, म्हणाली…


Leave A Reply

Your email address will not be published.