×

‘हिंदी आता राष्ट्रभाषा नाही…’, ‘केजीएफ २’च्या दमदार कमाई दरम्यान किच्चा सुदीपने मारले बॉलिवूडला टोमणे

कन्नड चित्रपट अभिनेता किच्चा सुदीप (Kiccha Sudeepa) अलीकडेच ‘आर: द डेडलीस्ट गँगस्टर एव्हर’ या चित्रपटाच्या लॉन्च कार्यक्रमादरम्यान म्हणाला की, हिंदी आता राष्ट्रभाषा राहिली नाही. सुपरस्टार यशच्या (Yash) नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘केजीएफ २’ या चित्रपटाच्या यशाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य आले आहे. ‘केजीएफ २’ हा एक कन्नड चित्रपट आहे, जो हिंदीसह अनेक भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला हिंदी भाषिक भागात चांगला प्रतिसाद मिळाला असून, केवळ ११ दिवसांत याने ३०० कोटींहून अधिक कमाई केली आहे.

अलिकडेच समोर आलेल्या एका व्हिडिओमध्ये ‘केजीएफ २’ बद्दल बोलताना किच्चा सुदीप म्हणाला, “तुम्ही म्हणालात की एक पॅन इंडिया चित्रपट कन्नडमध्ये बनला आहे. मला त्यात सुधारणा करायची आहे. हिंदी आता राष्ट्रभाषा नाही. ती (बॉलिवुड) आता पॅन इंडियाचे चित्रपट बनवत आहेत. ते लोक तमिळ आणि तेलगू भाषेतील चित्रपट डब करून (यशासाठी) धडपडत आहेत, पण तसे होत नाहीये. आज आम्ही असे चित्रपट बनवत आहोत, जे सर्वत्र पाहिले जात आहेत.” (kiccha sudeep reacts to kgf 2 being called a pan india film made in kannada)

किंबहुना अलीकडच्या काळात साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील अनेक चित्रपट हिंदी भाषेत खूप गाजले आहेत. ‘बाहुबली’च्या दोन्ही भागांना हिंदी भाषेत चांगला प्रतिसाद मिळाला आणि या चित्रपटाने अनेक मोठे विक्रम केले. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’च्या हिंदी व्हर्जननेही धमाकेदार कमाई केली. तसेच, हिंदी प्रेक्षकांमध्येही ‘केजीएफ २’ची खूप क्रेझ आहे आणि चित्रपटाची चांगली कमाई होत आहे.

अमित शाह यांनी केलं व्यक्तव्य
नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले होते की, “राजभाषेला देशाच्या एकात्मतेचा महत्त्वाचा भाग बनवण्याची वेळ आली आहे. जेव्हा इतर भाषा बोलणाऱ्या राज्यांतील लोक आपापसात संवाद साधतात, तेव्हा ते भारताच्या भाषेत असले पाहिजे. जोपर्यंत आपण इतर स्थानिक भाषांमधील शब्द स्वीकारून हिंदीला लवचिक बनवत नाही, तोपर्यंत त्याला चालना मिळणार नाही.” मात्र अमित शाहांच्या या वक्तव्यावर विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post