Saturday, April 20, 2024

…अन् ‘चुरा लिया है तुमने’ गाण्यातील दिग्गजअभिनेता पुढे केवळ या गोष्टीसाठी ओळखला जाऊ लागला

काही मालिका, चित्रपट हे येतात आणि इतिहास रचून जातात. त्या कार्यक्रमाबद्दल कायमस्वरूपी प्रेक्षकांच्या मनात आदर आणि आठवण असते. ९० च्या दशकात अशाच काही मालिका आल्या होत्या ज्यांनी मनोरंजन तर केलेच सोबत लोकप्रियतेचे शिखर देखील गाठले. टेलिव्हिजन क्षेत्रात इतिहास घडवणारी मालिका म्हणजे बी.आर.चोप्रा यांचे ‘रामायण’. या ‘रामायणाने’ तर असे रेकॉर्ड बनवले जे आजतागायत कोणाला तोडता आले नाही.

ही मालिका या मालिकेतील सर्व पात्र एका सिरीयल मधेच स्टार झाले. त्या सर्वाना लोकांनी ‘देव’ आणि ‘राक्षस’ अशी उपाधी देखील देऊन टाकली. याच रामायणातील ‘मेघदूत’ महत्वाची भूमिका साकारणारे कलाकार म्हणजे विजय अरोरा. कोरोनाच्या काळात दूरदर्शनवर पुन्हा रामायण सुरु झाले आणि पूर्वी इतकीच किंबहुना जास्तच लोकप्रियता आता सुद्धा रामायणाला मिळाली. विजय अरोरा यांनी रामायण करण्याआधी अनेक मोठ्या आणि हिट सिनेमात कामं केले होते. असं म्हणतात, विजय यांचे कामं आणि लोकप्रियता बघता राजेश खन्ना यांना देखील असुरक्षित वाटू लागले होते.

विजय अरोरा यांचा जन्म २७ डिसेंबर १९४४ ला अमृतसर मध्ये झाला. विजय यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया मधून शिक्षण घेत गोल्ड मेडल मिळवले. त्यानंतर त्यांनी १९७२ साली ‘जरुरत’ या सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमात रीना रॉय या त्याच्या सोबत मुख्य भूमिकेत होत्या. रीना यांचा देखील हा पहिलाच चित्रपट होता.

विजय यांना खरी ओळख मिळाली ती ‘यादो की बारात’ चित्रपटातून. विजय यांनी झीनत अमान सोबत या सिनेमात काम केले आणि त्या दोघाचे ‘चुरा लिया हैं’ गाणे सुपरहिट झाले. त्यानंतर विजय यांना अमाप लोकप्रियता मिळाली. त्याची लोकप्रिय बघून त्यावेळेचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना देखील आश्चर्य वाटायचे.

विजय अरोरा यांनी त्यावेळेच्या आशा पारेख, जीनत अमान, जया भादुड़ी, वहीदा रहमान, शबाना आजमी, तनुजा, परवीन बाबी, मौसमी चटर्जी या सर्व लोकप्रिय अभिनेत्रींसोबत काम केले. विजय यांनी फागुन, एक मुट्ठी आसमान, इंसाफ, रोटी, सरगम, नसीब, मेरी आवाज सुनो, सौतन, बड़े दिलवाला, विश्वात्मा आदी हिट सिनेमात काम केले.

विजय यांना टीव्हीवर काम करायचे नव्हते मात्र बी.आर.चोप्रा यांनी त्यांना खूप प्रयत्न करून मेघदूत भूमिकेसाठी तयार केले. त्यानंतर या भूमिकेने विजय यांना अमाप प्रेम दिले. विजय यांनी वयाच्या ६२ व्या वर्षी म्हणजेच २ फेब्रुवारी २००७ मध्ये या जगाचा निरोप घेतला.

हे देखील वाचा