Tuesday, April 23, 2024

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’चा टीझर रिलीज, रणवीर अन् आलिया रंगले एकमेंकाच्या प्रेमात

करण जोहरचा मोस्ट अवेटेड चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी‘चा टीझर रिलीज झाला आहे. या चित्रपटाची चाहत्यांना खूप दिवसांपासून प्रतीक्षा होती. अशा परिस्थितीत टीझर रिलीज झाल्याने चाहत्यांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. हा टीझर हुबेहुब करण जोहरच्या आधीच्या फॅमिली ड्रामा चित्रपटांसारखा दिसत आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहेत. या टीझरला रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच खूप व्ह्यूज मिळाले आहेत. अशा स्थितीत चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता स्पष्टपणे दिसून येत आहे.

मंडळी, 2019च्या ‘गली बॉय’ चित्रपटानंतर, रणवीर आणि आलियाला एकत्र पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत आणि करण जोहर देखील या चित्रपटाद्वारे 7 वर्षांनंतर दिग्दर्शनात पुनरागमन करत आहे. अशात करण जोहरचा चित्रपट आहे आणि शिफॉनच्या साड्या नेसून डोंगरावर नाचणारे कलाकार नाहीत हे कसे होऊ शकते. असेच काहीसे दृश्य या टीझरमध्येही दिसत आहे. 1 मिनिट 19 सेकंदाचा टीझर फॅमिली, डान्स, ड्रामा, रोमान्स आणि ट्विस्टने भरलेला आहे, जाे मोठ्या स्टारकास्ट असलेल्या ‘कभी खुशी कभी गम’ या ब्लॉकबस्टर चित्रपटाची आठवण करून देताे.

या टीझरला अवघ्या 39 मिनिटांत 149 हजार व्ह्यूज मिळाले आहेत. जे या चित्रपटाप्रती लोकांची उत्कंठा सांगते. हा चित्रपट यावर्षी 28 जुलै रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.(bollywood movie rocky aur rani kii prem kahaani teaser release karan johar alia bhatt ranveer singh shahrukh khan )

हे देखील वाचा