आतापर्यत अनेक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. शिवाजी महाराजांच्या सर्वच चित्रपटाला चाहते भरभरून प्रतिसाद देतात. शिवाजी महाराज आणि हिंदवी स्वराज्याची माहिती देणारा सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारीत एक चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. बहुचर्चित चित्रपट ‘सुभेदार गड आला पण…’ चा टीझर नुकताच लॉन्च झाला आहे. हा चित्रपट सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकुळ घालत आहे.
‘सुभेदार’ (subhedar) चित्रपट सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. हा चित्रपट 23 जून 2023 ला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिकेत झळकणार आहे. तर मृणाल कुलकर्णी माता जिजाऊंच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर पाहुन शिवप्रेमी भारावून गेले आहेत.
टीझर लॉन्च करताना निर्मात्यांनी घोषणा केली आहे. ते म्हणाले की, “आई भवानीच्या चरणी अर्पण करत आहोत श्री शिवराज अष्टकातील पाचवे चित्रपुष्प ‘सुभेदार’! 25 ऑगस्टला गाजणार सिंहगडाचा पोवाडा…” टीझर पाहुन युजर त्यावर खूप साऱ्या कमेंट करत आहेत. ‘सुभेदार’ चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.
‘सुभेदार’ चित्रपटाच्या टीझरने प्रेक्षकांच लक्ष वेधून घेतल आहे. हा टीझर 1 मिनिट 48 सेकंदाचा आहे. या टीझरमधील एका डायलाॅगने चाहत्यांना चांगलच वेड लावल आहे. कोंढाणा किल्ल्याची मोहीम आखताना शिवाजी महाराजांनी तानाजी मालुसरे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली होती. हि जबाबदारी पार पाडताना सुभेदार तानाजी मालुसरे यांनी “आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं” असे वचन महाराजांना दिले होते.
View this post on Instagram
‘सुभेदार’ चित्रपटात लोकांना सुभेदार तानाजी मालुसरे यांचा संपूर्ण इतिहास बघायला मिळणार आहे. तर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत अभिनेता अजय पुरकर झळकणार आहे. टीझर पाहून चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. एकाने लिहिले की, “टीझर पाहून अंगावर काटा आला, आता चित्रपट पाहण्याची खूप उत्सुकता वाढली आहे, जय शिवराय!” दुसऱ्याने लिहिले की, “आता सिंहगडाचा पोवाडा भी गाजणार अन सुभेदार भी…हर हर महादेव. (marathi the historical movie subhedar teaser out now the film willr elease on 25th august)
अधिक वाचा-
–‘सोनपरी’ बनून केलं प्रेक्षकांचं मनोरंजन! मृणाल कुलकर्णीबद्दल ‘या’ खास गोष्टी माहितीयेत का?
–सई ताम्हणकर स्पेनमध्ये फिरतेय ‘या’ व्यक्तीसोबत; दोघांचा खास फोटो तुफान व्हायरल…