Thursday, June 13, 2024

कॉमेडीचा तडका लावणाऱ्या विशाखा सुभेदारला ‘त्या’ व्हिडिओमुळे केले ट्रोल, नेटकरी म्हणाले…

कलाकार आणि सोशल मीडिया यांचे नाते खूपच अनोखे आहे. कलाकार नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या पोस्ट शेअर करत चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असतात. कलाकार आणि त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत येतात. अनेकदा कलाकार अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या मनातील विविध भावना व्यक्त करताना दिसतात. कधी त्या कामासंबंधी असचतात तर कधी वैयक्तिक आयुष्याशी संबंधित असतात. कलाकारांच्या अशा पोस्ट अनेकदा चाहत्यांसाठी चर्चेचा विषय ठरतात. मराठी मनोरंजनविश्वातील हरहुन्नरी अभिनेत्री आणि विनोदाची क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री म्हणजे विशाखा सुभेदार होय.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून विशाखाने (Vishaka Subhedar) तुफान लोकप्रियता मिळवली आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असतेय अनेकदा ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या पोस्ट दरवेळी प्रेक्षकांना खळखळून हसायला भाग पाडणाऱ्या असतात. नुकतीच विशाखाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. जो सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

‘कुर्रर्रर्रर्र’ या नाटकासाठी विशाखा परदेशात गेली होती. त्यावेळी तिने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या होत्या. त्यातील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालत असून चर्चेचा विषय बनला आहे. त्या व्हिडिओमध्ये ती डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vishakha Subhedar (@subhedarvishakha)

या व्हिडिओत विशाखाने ‘होले होले हो जाएगा प्यार’ या गाण्यावर डान्स केला आहे. विशाखाच्या या व्हिडिओवर चाहते भन्नाट कमेंट करत आहेत. एका युजरने तिला डिवचनाले आहे. त्याने कमेंट करत लिहीले की, “हे अति होत आहे”. त्याच्या या कमेंटला विशाखाने प्रतिउत्तर दिले आहे. ती म्हणाली, “ओके”.

विशाखा विषयी बोलायच झाले तर, ‘फु बाई फु’, महाराष्ट्राची हास्यजत्रा, ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ या कॉमेडी शोमधून एक विनोदी अभिनेत्री म्हणून स्वतः चा वेगळा ठसा उमटवला आहे. विशाखाने आतापर्यंत ‘फक्त लढ म्‍हणा’, ‘४ इडियट्स’, ‘अरे आवाज कोनाचा’ आदी अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले आहे. (Vishakha Subhedar who is a comedy star, was trolled because of ‘that’ video)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘या’ प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीला आहे बाजारात फिरण्याचा नाद; व्हिडिओ व्हायरल
‘टायगर 3’च्या सेटवरून व्हिडिओ लीक! शाहरुख अन् सलमानचा लूक पाहण्यासाठी चाहते उत्सुक

हे देखील वाचा