Friday, March 29, 2024

‘लाज नसल्यावानी ऑडिशनला…’, मृणाल ठाकूरने स्वत: बद्दल केले चकित करणारे खुलासे

टेलिव्हिजनवरून थेट बॉलिवूडच्या पडद्यावर झळकणारी अभिनेत्री मृणाल ठाकूर (Mrunal Thakur) आता लोकप्रिय अभिनेत्री बनली आहे. ती तिच्या चित्रपटांसाठी सतत चर्चेत असते. तिने २०१२ मध्ये ‘मुझसे कुछ कहते हैं.. ये खामोशियां’ या मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत प्रवेश केला होता. मात्र ‘कुमकुम भाग्य’ या टेलिव्हिजन शोमधून तिला खूप लोकप्रियता मिळाली.

यानंतर अभिनेत्रीने ‘लव्ह सोनिया’ या ड्रामा चित्रपटाद्वारे चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. ती ‘सुपर ३०’, ‘बटला हाऊस’ आणि ‘धमाका’ यासारख्या चित्रपटात दिसली आहे. तिच्या या प्रवासाविषयी बोलताना ती म्हणाली, “मी माझे आयुष्य जगत आहे. मला लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचायचे आहे. ‘कुमकुम भाग्य’ने मला साथ दिली. माझ्या जीवनाचे एकमेव ध्येय आहे, लोकांचे मनोरंजन करत राहणे.” (mrunal thakur says would shamelessly stand not move till my take was not taken)

ती म्हणाली, “मी खूप नशीबवान आहे की, मला ही संधी मिळाली. अनेक टीव्ही कलाकार या संधीची वाट पाहत आहेत. मी खूप मेहनत केली आहे. मी खूप संघर्ष केला आहे. मी निर्लज्जपणे ऑडिशनसाठी उभी राहायची आणि जोपर्यंत मला घेतले जात नाही तोपर्यंत मी तिथून हालायचे नाही मी खूप हट्टी होते आणि अजूनही आहे.”

या २९ वर्षीय अभिनेत्रीने शेअर केले की, ती हॉलिवूडची दिग्गज स्टार मेरील स्ट्रीपची फॅन आहे. मृणाल म्हणाली, “एकेकाळी अभिनेत्रींमध्ये सेल्फ लाइफ असायची, त्यांच्याकडे काम असायचे. पण आता ओटीटी प्लॅटफॉर्म आले आहे. शेफाली शाह असो किंवा माधुरी दीक्षित नेने, या वयातही लोक त्यांना खूप पसंत करतात.”

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर मृणाल ठाकूर लवकरच ‘जर्सी’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिने शाहिद कपूरसोबत (Shahid Kapoor) मुख्य भूमिका साकारली आहे.

हे देखील वाचा