×

मृण्मयी देशपांडेने रोमँटिक फोटो शेअर करत पतीसाठी लिहिली खास पोस्ट, एक नजर टाकाच

मराठी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाइतक्याच सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतात. आपल्या लाडक्या कलाकाराच्या दैनंदिन आयुष्याबद्दल जाणून घ्यायची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता लागलेली असते. त्यामुळे सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांच्या प्रत्येक पोस्टवर त्यांचे चाहतेही भरभरुन प्रतिक्रिया देत असतात. सध्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडेची (Mrunmayee Deshpande) अशीच एक सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. जी तिने तिच्या पतीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केली आहे.

मृण्मयी देशपांडे ही मराठी सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने मनोरंजन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आपल्या चित्रपटांइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असते. त्यावरून ती अनेक नवनवीन फोटो आणि व्हिडिओ आपल्या चाहत्यांशी शेअर करत असते. सध्या मृण्मयीने पतीच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेली एक सुंदर सगळीकडे चर्चेत आली आहे.

मृण्ययीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन पतीसोबतचा रोमँटिक फोटो शेअर करत, खास शब्दात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हायरल फोटोमध्ये पतीच्या मिठीत असलेली मृण्मयी खूपच मनमोहक दिसत आहे. फोटोसोबत तिने, “वाढदिवसाच्या शुभेच्छा राव, मला तुझी खूप आठवण येत आहे.” असे कॅप्शन दिले आहे. मृण्मयीच्या या पोस्टवर तिच्या चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान सध्या अभिनेत्री मृण्मयी सध्या तिच्या आगामी ‘चंद्रमुखी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Mrunmayee Deshpande- Rao (@mrunmayeedeshpande)

या चित्रपटात मृण्मयीने दौलत देशमानेच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांच्या चंद्रमुखी या कादंबरीवर हा चित्रपट आधारित आहे. ज्यामध्ये अमृता खानविलकर (Amruta Khanvilkar), आदिनाथ कोठारे (Adinath Kothare), यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसाद ओकने (Prasad Oak) केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

 

Latest Post