×

‘माझ्या आकारामुळे मला…’, जर्सी फेम मृणाल ठाकूरने सांगितला बॉडी शेमिंगबद्दलचा विचित्र अनुभव

हिंदी चित्रपट जगतातील कलाकार आणि त्यांचे चाहते यांच्यातील अनेक किस्से आपल्याला ऐकायला मिळत असतात. या कलाकारांच्या प्रत्येक गोष्टींवर नेटकऱ्यांचे लक्ष असते आणि यावरुन त्यांना अनेकदा नेटकऱ्यांच्या रोशाला सामोरे जावे लागते. यामध्ये चित्रपट जगतातील अभिनेत्रींना बॉडी शेमिंगवरुन ट्रोल केल्याचे अनेक किस्से अनेकदा समोर आले आहेत. करीना कपूर खानपासून मलायका अरोरा, पलक तिवारी, अनेरी वजानीपर्यंत अनेक सौंदर्यवती बॉडी शेमिंगच्या बळी ठरल्या आहेत. या यादीत शाहिद कपूरची (Shahid Kapoor) ‘जर्सी’ अभिनेत्री मृणाल ठाकूरच्या (Mrunal Thakur) नावाचाही समावेश आहे. खुद्द मृणालने आता बॉडी शेमिंगवर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत, मृणाल ठाकूरने बॉडी शेमिंगवर खुलासा करताना सांगितले की, एकेकाळी तिच्या फिगरमुळे ट्रोल तिला ‘मटका’ म्हणायचे. सोशल मीडियावर तिच्या फिगरमुळे अशा अनेक कमेंट करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर तिच्या फिगर प्रमाणेच तिच्या सौंदर्याबद्दलही अनेक असभ्य प्रतिक्रिया आल्या होत्या, असा धक्कादायक खुलासा केला होता. ट्रोलिंग आणि बॉडी शेमिंगवर बोलताना, मृणालने सांगितले की, तिच्या फिगरसाठी तिला कशाप्रकारे ट्रोल केले जायचे. ती म्हणाली, “यावेळी माझं वजन कमी झालं तर, आधी मी माझ्या चेहऱ्यावरचे वजन कमी करायला सुरुवात केली, मग माझ्या वरच्या शरीरातून आणि मग ते माझ्या खालच्या शरीरात पोहोचते. पण, यानंतरही माझा आकार तसाच राहीला.” असे मत तिने व्यक्त केले होते.

View this post on Instagram

A post shared by Mrunal Thakur (@mrunalthakur)

याबद्दल बोलताना मृणालने अशा प्रकारे ट्रोल केल्याने तिला खूप नैराश्य आले होते आणि तिचा आत्मविश्वासही कमी झाला होता असाही खुलासा केला होता. याबद्दल बोलताना ती म्हणते की, “झिरो फिगर असणे आवश्यक नाही. तंदुरुस्त आणि निरोगी राहणे महत्त्वाचे आहे. आणि मग तुम्ही झिरो फिगरमध्ये किंवा वाढलेल्या वजनात चांगले दिसाल, हे सर्व शरीराच्या आकारावर अवलंबून असते. कारण, आपल्या सर्वांच्या शरीराचा आकार वेगवेगळा असतो.” दरम्यान अभिनेत्री मृणाल सध्या तिच्या ‘जर्सी’ चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

Latest Post