Sunday, June 22, 2025
Home मराठी मृण्मयी देशपांडेच्या सुंदर फोटोंवर चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

मृण्मयी देशपांडेच्या सुंदर फोटोंवर चाहते तर सोडाच, कलाकारांनीही पाडला कमेंट्सचा पाऊस

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘अग्निहोत्र’ या मालिकेतून करिअरला सुरुवात करणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. ‘कुंकू’ या लोकप्रिय मालिकेत जिला बघून प्रत्येक घरातील सासूला वाटायचे की, सून असावी तर अशी. तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने आज प्रत्येक मराठी माणसाच्या मनावर तिचा ठसा उमटला आहे. मृण्मयी ही सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. अशातच तिने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती फारच मनमोहक दिसत आहे.

मृण्मयीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेल्या पहिल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, तिने सोनेरी रंगाचा काठ असणारी एक सुंदर साडी परिधान केली आहे. यावर तिने चॉकलेटी रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला आहे. यासोबत तिने कानात झुमके घातलेले दिसत आहेत. तसेच छोटीशी टिकली लावलेली आहे. तिने सगळे केसही मोकळे सोडलेले आहेत. यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये ती सत्यजित दुबेसोबत दिसत आहे. ती ‘मुंबई डायरिज’ या सीरिजचे प्रमोशन करण्यासाठी संपूर्ण टीमसोबत स्टेजवर दिसत आहे.

तिने शेअर केलेल्या या फोटोवर अनेकजण कमेंट करत आहेत. तिच्या या फोटोवर अमृता खानविलकरने “तुझा अभिमान आहे,” अशी कमेंट केली आहे, तर सत्यजित दुबेने “प्यारी,” अशी कमेंट केली आहे. नताशा भारद्वाजने “खूप सुंदर,” अशी कमेंट केली आहे. तिचे अनेक चाहते या फोटोवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. (Mrunmayee deshpande’s photo viral on social media)

मृण्मयी ही मराठी चित्रपटसृष्टीतील गाजलेली नायिका आहे. तिने तिच्या करिअरमध्ये मराठी तसेच हिंदी मालिकेत काम केले आहे. मराठीतील तिचे अनेक चित्रपट सुपरहिट ठरले आहेत. यात ‘नटसम्राट’, ‘फर्जंद’, ‘मन फकिरा’, ‘कट्यार काळजात घुसली’, ‘बोगदा’ यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच तिने ‘छत्रीवाली’ या मालिकेत देखील काम केले आहे. सध्या तो झी मराठीवरील ‘सारेगामापा लिटिल चॅम्प्स’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. तसेच तिची ‘सोप्प नसतं काही’ ही वेबसीरिज देखील प्रदर्शित झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सैराट’ फेम आर्चीच्या लूकमध्ये आलाय कमालीचा बदल; चाहत्यांकडून थेट श्रीदेवींशी केली जातेय तुलना

-‘गुलाबाची कळी’ तेजस्विनी पंडितचा सुंदर लूक पाहून कलाकारांसोबत चाहतेही झाले ‘शायर’, म्हणतायत…

-‘इंडियन आयडल १२’च्या ग्रँड फिनालेने टेलिव्हिजन विश्वात नोंदवला ‘हा’ खास विक्रम; टीमने आनंद साजरा केला

हे देखील वाचा