Friday, March 29, 2024

न्यूड फोटोशूट अंगलट येणार! मुंबई पोलिस पोहोचले रणवीरच्या घरी, अभिनेता फरार

रणवीर सिंगने (Ranveer Singh) जेव्हापासून न्यूड फोटोशूट केले आहे तेव्हापासून तो खूप चर्चेत आहे. काहींना त्याची स्टाईल खूप आवडली, तर काहींना त्याच्या या फोटोशूटचा राग राग आला. याप्रकरणी रणवीर सिंगविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती आणि आता या संदर्भात शुक्रवारी मुंबई पोलीस अभिनेत्याच्या घरी पोहोचले जेथे रणवीर उपस्थित नव्हता, त्यामुळे मुंबई पोलीस घाईघाईने परत आले. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला जाणून घेऊ. 

अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटने बॉलिवूडमध्ये चांगलीच खळबळ माजवली आहे. सोशल मीडियावर या फोटोंविरोधात चांगलाच संताप पाहायला मिळाला होता. अनेकांनी त्यावर जोरदार टिका करत पोलिसात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याच्या याच फोटोशूटमुळे रणवीर सिंग आता चांगलाच अडचणीत येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण रणवीर सिंगच्या शोधात मुंबई पोलिस त्याच्या घरापर्यंत पोहोचल्याची बातमी समोर आली आहे.

शुक्रवारी मुंबई पोलीस अभिनेता रणवीर सिंगच्या घरी पोहोचले जिथे तो शहरात नसल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलीस परतले.रणवीर परतल्यावर त्याला नोटीस देण्यासाठी मुंबई पोलीस पुन्हा त्याच्या घरी जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 22 ऑगस्टपूर्वी रणवीरला चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर व्हावे लागणार असल्याचे बोलले जात आहे.

रणवीरने गेल्या महिन्यात एका मासिकाच्या कव्हर पेजसाठी न्यूड फोटोशूट केले होते, त्यानंतर तो अचानक चर्चेत आला होता. ज्याने ही छायाचित्रे पाहिली, तो आश्चर्यचकित झाला कारण रणवीरची स्टाईल तिथे आधी दाखवण्यात आली होती. या फोटोंमध्ये रणवीर पूर्णपणे न्यूड होता. त्यामुळेच त्याच्यावर चौफेर टिका झाली होती.

हेही वाचा –

नंदिता वहिनींच्या मनमोहक अदा! फोटो पाहून नेटकरी फिदा

‘लायगर’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अनन्या आणि विजय देवरकोंडाने काढली शक्कल, थेट शेतात जाऊन केला रोमान्स

कथित एमएमएसवर अंजली अरोराने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाली, ‘माझ्या लहान भावानेही…’ .

हे देखील वाचा