Wednesday, May 14, 2025
Home बॉलीवूड चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘शहजादा’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज,पाहा व्हिडिओ

चाहत्यांची प्रतीक्षा संपली! ‘शहजादा’ चित्रपटातील पहिलं गाणं रिलीज,पाहा व्हिडिओ

कार्तिक आर्यन आणि क्रिती सेननचा ‘शेहजादा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट दक्षिणेतील अभिनेता अल्लू अर्जुन आणि पूजा हेगडे अभिनीत तेलगू चित्रपट ‘अला वैकुंठापुरामालु’ चा रिमेक आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. अशात आज म्हणजे सोमवारी (दि.16 जानेवारी) या चित्रपटाचे पहिले गाणे रिलीज झाले आहे, ज्याचे नाव आहे ‘मुंडा सोना हूं मैं’.

गाण्याला मिळतेय प्रेक्षकांची पसंती?
या चित्रपटातील गाण्यात कार्तिक  karthik aryan) आणि क्रिती (kriti sanon) हिची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. गाण्यात कार्तिक आणि क्रितीचा परफॉर्मन्स खूपच दमदार दिसत आहे. ‘शेहजादा’ चित्रपटातील पहिले गाणे कार्तिक आर्यनच्या चाहत्यांनाही खूप आवडले आहे. मंडळी, आम्ही तुम्हाला सांगताे की, हे गाणं बीच पार्टीचे वातावरण देत आहे. हे गाणे दिलजीत दोसांझ आणि निकिता गांधी यांनी गायले आहे, तर बॉस्को सीझरने कोरिओग्राफ केले आहे.

10 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार ‘शेहजादा’
‘शेहजादा’ चित्रपटात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाते दिग्दर्शन रोहित धवनने केले आहे. हा चित्रपट ऍक्शनने भरलेला असून फॅमिली म्युझिकल ड्रामा आहे. ‘शेहजादा’ हा चित्रपट 10 फेब्रुवारीला सिनेमागृहात प्रदर्शित हाेणार आहे.

क्रिती अन् कार्तिक ‘लुका छुपी’ चित्रपटातही दिसले एकत्र
क्रिती सेनन आणि कार्तिक आर्यन यांच्या अभिनय काराकिर्द विषयी बाेलायचे झाले, तर याआधीही हे कलाकार ‘लुका छुपी’ या चित्रपटात एकत्र दिसले हाेते. या स्टार व्यतिरिक्त या चित्रपटात परेश रावल आणि मनीषा काेईराला यांचाही समावेश आहे. (bollywood actre`s`s kriti sanon and karthik aryan song munda sohna hoon main released)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘आपल्या मुलांना मोठे होताना पाहणे…’ रवीना टंडनने लिहिली मुलगी राशासाठी खास पोस्ट

चार दिन की चांदनी! गौतमी पाटीलवर मेघा घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया; म्हणाल्या, ‘सगळ्या मर्यादा…’

हे देखील वाचा