बबिताजी उर्फ मुनमुन दत्ताने सोडला ‘तारक मेहता का उलटा चष्मा’? बऱ्याच दिवसांपासून शोमधून गायब आहे अभिनेत्री


टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे नवनवे रेकॉर्ड तयार करणारा कॉमेडी शो म्हणजे ‘तारक मेहता का उलटा चष्मा.’ हा शो मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे अविरतपणे मनोरंजन करत आहे. या मालिकेने यात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला एक मोठी आणि अढळ ओळख दिली. या मालिकेतील सर्वच पात्र जणू प्रेक्षकांच्या घरातलेच बनले आहेत. या शोमध्ये प्रत्येक कलाकाराला एक वेगळे महत्व आहे. याच शोमधील जेठालालच्या हृदयाची परी असणारी बबिता देखील सर्वांचीच लाडकी आहे. तिने तिच्या सौंदर्याची भुरळ जेठालालसोबतच संपूर्ण रसिकांवर घातली आहे. याच बबिताजीच्या संदर्भातील एक बातमी सध्या खूप गाजत आहे.

एका रिपोर्टनुसार मुनमुन दत्ता मागील काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उलटा चष्मा’च्या सेटवर येत नाहीये. बरेच दिवस झाले ती शूटिंगसाठी आली नसल्याचे सांगितले जात आहे. माहितीनुसार शोची संपूर्ण टीम महाराष्ट्र कोरोनामुळे शूटिंगसाठी आलेल्या बंधनांमुळे दमणला जाऊन शूटिंग करत होती. जसा महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग कमी झाला तशी मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये शूटिंगला परवानगी देण्यात आली. त्यामुळे दमणवरून शोची टीम शूटिंग पूर्ण करून एक महिन्यापूर्वीच मुंबईत परतली. मुंबईत शूटिंगला सुरुवात होऊनही मुनमुन सेटवर आली नाहीये. ती शोमध्ये येत नसल्याने तिचे पात्र देखील तसेच लिहिले जात आहे. (Munmun Dutta Quit Taarak Mehta Ka Ooltah Chashmah)

एका माहितीनुसार मुनमुन तेव्हापासून सेटवर आली नाहीये, जेव्हापासून ती एका वादात अडकली आणि तिच्यावर केस दाखल करण्यात आली होती. शिवाय इंडस्ट्रीमध्ये ही देखील चर्चा आहे की, ती लवकरच हा शो सोडणार आहे. मात्र याबद्दल ना शोकडून, नाही मुनमुनकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आले आहे.

दरम्यान मुनमुन दत्ताने तिचा एक मेकअपशी संदर्भातील एक व्हिडीओ युट्यूबवर अपलोड केला होता. मुनमुन लवकरच स्वतःचे युट्यूब चॅनल सुरू करणार असून, त्यासाठी तिला छान दिसायचे असल्याचे यावेळी तिने सांगितले. पुढे तिने एका जातीचे नाव घेत म्हटले की, तिला यांच्यासारखे दिसायचे नाही. तिच्या या उल्लेखामुळे प्रचंड वाद उसळला आणि तिच्यावर केस दाखल झाली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कुरूप तुम्ही नाही तर समाज आहे…’; जॅकलिन फर्नांडिसने केवळ टॉवेलने शरीर झाकत दिली फोटोसाठी पोझ

कार्तिक आर्यनच्या नव्या चित्रपटाची घोषणा; आता पायलट बनून अभिनेता जिंकणार रसिकांची मनं

कृष्णा श्रॉफचा टॉपलेस फोटो पाहून दिशा पटानीही झाली हैराण; प्रतिक्रिया देत म्हणाली, ‘तुझी बॉडी…’


Leave A Reply

Your email address will not be published.