Friday, November 22, 2024
Home साऊथ सिनेमा अशी झाली नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या प्रेमाची सुरुवात; जाणून घ्या त्यांची प्रेमकहाणी

अशी झाली नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या प्रेमाची सुरुवात; जाणून घ्या त्यांची प्रेमकहाणी

दक्षिण भारतीय अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya)आणि त्याची गर्लफ्रेंड अभिनेत्री शोभिता धुलिपाला गुरुवारी सकाळी हैदराबादमध्ये पारंपारिक पद्धतीने साखरपुडा केलेला आहे. याची घोषणा नागा चैतन्यचे वडील, ज्येष्ठ अभिनेते नागार्जुन यांनी त्यांच्या X वर केली आहे. नागार्जुन एंगेजमेंटमुळे खूप खुश आहे. पोस्ट शेअर करताना त्यांनी नागा चैतन्य आणि शोभिता यांना आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या आहेत. नागा चैतन्य आणि शोभिता खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. चला तर जाणून घेऊया या दोघांची प्रेमकहाणी कधी आणि कुठे सुरू झाली?

नागा चैतन्य आणि समंथा यांनी 2021 मध्ये एकमेकांना घटस्फोट दिला. त्यानंतर नागा चैतन्यने त्यांच्या आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला एकमेकांना डेट करू लागले. सुरुवातीला दोघेही गुपचूप भेटत राहिले, पण प्रेम लपवता येत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या दोघांच्या बाबतीतही असेच घडले. त्यांच्या डेटींगच्या बातम्या मीडियामध्ये येऊ लागल्या. सार्वजनिक ठिकाणीही ते अनेकदा एकत्र दिसले.

दोघांच्या डेटिंगच्या अफवांना अनेकदा व्हायरल झालेल्या फोटोंमुळे उधाण आलं होतं. सामंथापासून घटस्फोट घेतल्यानंतर काही महिन्यांतच नागा चैतन्यने शोभिताला डेट करायला सुरुवात केली होती. दोघेही अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसले. मात्र, दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल काहीही सांगितले नाही.

नागा चैतन्य आणि शोभिता यांचे नाते अधिक घट्ट झाले. तो त्याच्या डेटींगच्या संदर्भात चर्चेत राहिला पण त्यावर कधीच उघडपणे काहीही बोलला नाही. रिपोर्ट्सनुसार, एका व्हायरल फोटोमध्ये दोघे युरोपमध्ये सुट्टी घालवताना दिसत होते. वास्तविक, नागाच्या एका फोटोमध्ये शोभिता त्याच्या मागे टेबलावर बसली असल्याचा दावा करण्यात आला होता.

समंथा आणि नागा चैतन्य यांचे 2017 मध्ये लग्न झाले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लग्नाच्या तीन वर्षानंतर दोघांमध्ये मतभेद सुरू झाले. त्यामुळे दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येत आहे. अखेर दोघांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि 2021 मध्ये वेगळे झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा – 

बिग बॉसमध्ये जायला अंकिताने दिला होता नकार; अभिनेत्रीचा जुना व्हीडीओ चर्चेत…
पत्नीला घेऊन मूव्ही डेटवर गेला वरून धवन! चाहते म्हणाले दोघेही हनी बनी कपल दिसत आहात…

हे देखील वाचा