Saturday, June 15, 2024

सरकारच्या कुस्तीपटूंवरील कारवाईनंतर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम वनिता खरातची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल

छोट्या पडद्यावरील गाजलेला कार्यक्रम ‘महाराष्टाची हास्यजत्रा’मुळे वनिता खरात घराघरात लोकप्रिय झाली आहे. या आगोदर ही वनिताने चित्रपटात काम केलं आहे. परंतु, तिला खर्‍या अर्थांन लोकप्रिय मिळाली ती महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून. वनिता सोशल मीडियावर सक्रिय असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक विषयांवर आपले मत व्यक्त करत असते. वनिताने सोशल मीडियावर सध्या एक पोस्ट शेअर केली आहे. जी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

रविवारी (२८ मे) पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नव्या संसद भवनाचं उद्घाटन केलं. याचवेळी उद्घाटन सुरू असताना आंदोलन करणारे कुस्तीगीर व दिल्ली पोलिसांमध्ये हानामारी झाली. यात दिल्ली पोलिसांनी साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनियासह अन्य कुस्तीपटूंना ताब्यात घेतल आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या सर्व प्रकरणावर राजकीय नेते मंडळी, तसेच कलाकार आपली मत मांडत आहेत. यावर वनिताने (Vanita Kharat) देखील प्रतिक्रिया दिली आहे.

कुस्तीपटू दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर गेल्या 35 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होत. त्याच विषयावरुन वनिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन स्टोरी शेअर केली आहे. त्या स्टोरीमध्ये तिने दिल्ली पोलीस व कुस्तीगीरांच्या झटापटीदरम्यानचे फोटो शेअर केले आहेत. ही स्टोरी शेअर करताना तिने दु:ख व निशब्द व्यक्त करणारे इमोजीही पोस्टवर लावले आहेत.

दरम्यान, वनिता विषयी बोलायच झाल तर, विनोदाची अद्भुत भावना असलेली वनिता प्रेक्षकांना खूप हसवते. मराठीसोबतच वनिताने बॉलिवूडमध्येही स्वत:चे नाव कमावले आहे. वनिता ‘कबीर सिंह’ चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिने शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. ‘कबीर सिंह’ चित्रपटात वनिता मोलकरणीच्या भूमिकेत दिसली होती. त्याच्या त्या भूमिकेचेही कौतुक झाले होते. (Post of ‘Maharashtra Laughter Fair’ fame Vanita Kharat goes viral after action against wrestlers)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
हेमा मालिनी यांनी फाेटाे शेअर करत संसद भवनाची दाखवली सुंदर झलक, सांगितली ‘ही’ खास गाेष्ट
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली पलक तिवारी; चाहते म्हणाले, ‘आई जास्त हॉट…’

हे देखील वाचा