Sunday, June 23, 2024

जीवाची पर्वा न करता सुनील दत्त यांनी नर्गिस यांच्यासाठी मारली होती आगीत उडी, अशी सुरु झाली ही प्रेमकहाणी

बॉलिवूडमध्ये अनेक अशा प्रेमकहाण्या आहेत, ज्या बॉलिवूडच्या इतिहासात अजरामर झाल्या. आज अनेक वर्षांनी देखील त्या प्रेमकहाण्यांची उदारहरने दिली जातात. काही प्रेमकहाण्या यशस्वी झाल्या, तर काही अपूर्णच राहिल्या. मात्र, त्या अपूर्ण प्रेमकहाण्या देखील खूपच रंजक होत्या. आज नर्गिस यांची जयंती आहे. चला, तर मग यानिमित्त जाणून घेऊया त्यांची आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी…

raj kapoor and nargis

जेव्हा जेव्हा हिंदी सिनेमातील सर्वात सुंदर, प्रतिभावान अभिनेत्री नर्गिस (Nargis) यांचा उल्लेख केला जातो, तेव्हा तेव्हा राज कपूर (Raj Kapoor) यांच्यासोबतचे त्यांचे गोड नाते लगेच आठवते. या दोघांचे नाते त्या काळात इंडस्ट्रीमध्ये आणि मीडियामध्ये देखील तुफान गाजले. या दोघांचे नाव नेहमीच सोबत घेतले जायचे, मात्र असे असूनही हे नाते फट नर्गिस यांच्याकडूनच निभावले जात होते. नर्गिस यांच्या स्वप्नातील राजकुमार राज कपूर कधीच नव्हते जे त्यांना आयुष्यभर साथ देतील. त्यांच्या आयुष्यातील खरे हिरो होते, सुनील दत्त (Sunil Dutt), ज्यांनी जीवनातील प्रत्येक वळणावर चांगल्या वाईट गोष्टींमध्ये नर्गिस यांची साथ सोडली नाही. स्वतःच्या जीवावर उदार होत त्यांनी नर्गिस यांना सेटवर लागलेल्या आगीतून वाचवले होते.

sunil dutt and nargis

दिग्गज अभिनेत्री असलेल्या नर्गिस यांच्यावर लिहिलेल्या, ‘डार्लिंगजी: द ट्रू लव स्टोरी ऑफ नरगिस एंड सुनील दत्त’ पुस्तकात नर्गिस आणि सुनील दत्त यांच्या प्रेमकहाणीचा (Nargis and Sunil Dutt Love Story) प्रामुख्याने उल्लेख केलेला दिसतो. नर्गिस आणि सुनील दत्त यांची प्रेमकहाणी सुरु झाली ती ‘मदर इंडिया’च्या सेटवर. या सिनेमाच्या सेटवर कोरड्या गवताच्या मोठमोठ्या पेंड्या ठेवण्यात आल्या होत्या. आणि एक सीन शूट होणार होता, ज्यात नर्गिस त्यांच्या मुलाला अर्थात सुनील दत्त यांना आगीच्या लोटातून वाचवतात. सेटवर गवताळ आग लावली गेली आणि अचानक हवेची दिशा बदलली आणि आग जास्तच भडकली. त्यात नर्गिस अडकल्या. ते पाहून कोणताही मागचा पुढचा विचार न करता सुनील दत्त आगीत कुदले आणि त्यांनी नर्गिस यांना वाचवले.

sunil dutt and nargis

या घटनेत दोघेही जखमी झाले होते. दोघानांही रुग्णालयात ऍडमिट करावे लागले. त्या काळातच नर्गिस यांना जाणीव झाली की, सुनील दत्त यांनी कोणताही विचार न करता जीवाची पर्वा न करता त्यांना वाचवण्यासाठी आगीत आले. पुढे हळूहळू नर्गिस आणि सुनील दत्त एकमेकांच्या जवळ आले. नर्गिस यांनी त्यांच्या आयुष्यातील लहान मोठ्या सर्वच गोष्टी सुनील दत्त यांच्याजवळ मोकळे पणाने व्यक्त केल्या असे असूनही सुनील दत्त त्यांच्या प्रेमात पडले. पुढे या दोघांनी 1958 साली लग्न केले. त्यांना संजय दत्त, प्रिया दत्त मिळून तीन मुलं झाली. सुनील दत्त आणि नर्गिस यांची साथ 23 वर्ष होती. पुढे नर्गिस यांचे कॅन्सरमुळे निधन झाले आणि सुनील दत्त एकटे पडले. मात्र त्यांनी सिद्ध केले खरे प्रेम कसे असते.(valentines day 2022 nargis sunil dutt love story)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
‘चित्रपटांमध्ये प्रेमळ वागते अन् वास्तवात…’, करीना कपूर का हाेतेय ट्राेल? लगेच वाचा
मनोरंजनविश्वातील ‘या’ अभिनेत्याचे लिव्हरच्या गंभीर आजाराने निधन, उपचारासाठी पैशांची जुळवाजुळव होती चालू

 

हे देखील वाचा