आशा भोसले, सुनील दत्त ते बच्चन कुटुंबीय! भारतीय सिनेसृष्टीने केलेले सगळे वर्ल्डरेकॉर्ड एकाच ठिकाणी

0
115
Asha-Bhosle-And-Ashok-Kumar

भारतीय सिनेसृष्टी ही जगभरातील एक मोठी सिनेसृष्टी मानली जाते. दरवर्षी १५-२० पेक्षाही अधिक सिनेमे रिलीज होत असतात. त्यामुळे चित्रपट आणि त्याच्याशी निगडीत कलाकारांची नेहमीच चर्चा होत असते. त्यासाठी विविध कारणंही असतात. काही कारणं तर एकदम अनोखी आणि विशेष असतात, पण तुम्हाला माहित आहे का की काही भारतीय चित्रपट आणि कलाकार असे आहेत, ज्यांची नावांची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहेत. या लेखातून आपण त्या रेकॉर्ड्सवर नजर टाकू.

दिग्गज भारतीय गायकांमध्ये कुमार सानू हे नाव नेहमीच घेतलं जातं. त्यांनी नव्वदच्या दशकात अनेक गाणी गायली. त्यांनी रोमँटिक गाणी तर सर्वाधिक प्रसिद्ध झाली. त्यांच्याही नावावावर एक मोठा गिनीज रेकॉर्ड आहे. त्यांनी २८ गाणी एकाच दिवशी रेकॉर्ड केली होती.

बाहुबली‘ या बिगबजेट चित्रपटाने तसे अनेक विक्रम मोडले. हा चित्रपट सर्वाधिक गाजलाही. ज्या ज्या वेळी गाजलेल्या भारतीय चित्रपटांची चर्चा होईल, त्या त्या वेळी बाहुबलीचे नाव नक्कीच घेतले जाईल. पण या चित्रपटानेही एक मोठा इतिहास घडवला आहे. ‘बाहुबली: द बिगिनिंग’ या चित्रपटाचा जवळपास ५०,००० स्क्वेअर फुटचा पोस्टर बनवण्यात आला होता. ४,७८३.६५ मीटर स्केअरच्या एरियामध्ये कोची येथे ग्लोबल युनायटेड मिडीया कंपनी प्रायवेट लिमिटेडने पोस्टर केले होते.

मंडळी, तुम्हाला माहित आहे का अभिषेक बच्चननेही मोठा रेकॉर्ड केला आहे. त्याने १२ तासांमध्ये सर्वाधिक पब्लिक अपेरियन्स केले आहेत. त्याने दिल्ली-६ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सर्वाधिक ठिकाणी भेट दिली होती.

भारतीय चित्रपटांमध्ये अनेक अभिनेते आहेत, ज्यांनी पोलिसांची भूमिका निभावली आहे. पण तुम्हाला माहित आहे का जगदीश राज यांनी जवळपास १४४ चित्रपटांमध्ये इंस्पेक्टरची भूमिका निभावली आहे. त्यांचा हा एकाचप्रकारच्या सर्वाधिक भूमिका करण्याचा रेकॉर्डही आहे. त्यांनी डॉन, सिलसिला आशा हिट चित्रपटांमध्येही पोलिसांची भूमिका निभावली आहे.

अभिनेत्री ललिता पवार यांच्या नावावरही एक विशेष रेकॉर्ड आहे. त्यांनी सिनेसृष्टीत सर्वाधिक काळ काम केले आहे. त्या जवळपास ७० पेक्षाही अधिक वर्षे इंडस्ट्रीमध्ये सहभागी आहेत. त्यांनी वयाच्या १२ व्या वर्षीय या इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. तसेच त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत ७०० पेक्षाही अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

अभिनेते अशोक कुमार यांनी जवळपास ६३ वर्षे अभिनय क्षेत्रात काम केले. त्यांनी जीवन नैय्या या चित्रपटातून १९३६ साली पदार्पण केले होते. तेव्हापासून त्यांनी त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या अनेक चित्रपटांमध्ये कामं केली. त्यामुळे सर्वाधिक काळ बॉलिवूडमध्ये प्रमुख भूमिका करण्याचा विक्रम त्यांच्या नावावर झाला.

सन १९६४मध्ये आलेल्या ‘यादें’ या चित्रपटानेही एक इतिहास घडवला आहे. या चित्रपटात केवळ सुनील दत्त एक एकच अभिनेते दिसतात. नर्गिसही या चित्रपटाचा भाग होत्या, पण त्यांचे केवळ छायाचित्र या चित्रपटात दिसत होते. त्यामुळे या चित्रपटात केवळ सुनील दत्त हे एकच अभिनेते दिसत असल्याने हा एक रेकॉर्ड आहे.

एखादा चित्रपट बनायला साधारण किती वेळ लागावा असं विचारलं तर तुम्ही म्हणाल, जास्तीत जास्त १ वर्ष २ वर्ष, पण लव अँड गॉड अर्थात कैस और लैला या चित्रपटाला बनायला २० वर्षांहून अधिक काळ लागलेला. हा चित्रपट बनत असताना प्रमुख भूमिका निभावणाऱ्या गुरु दत्त यांचे निधन झाले, त्यानंतर १९७१ मध्ये दिग्दर्शक के असिफ यांचेही निधन झाले. त्यानंतर १९८६ साली हा चित्रपट अखेर रिलीज झाला. यात संजीव कपूर यांनी मुख्य भूमिका केली.

भारतातील दिग्गज गायकांमध्ये आशा भोसले यांचे नाव नेहमीच घेतले जाईल. त्यांनी आजपर्यंत अनेक हिट गाणी गायली आहेत. पण २०११ मध्ये त्यांचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बूकमध्ये नोंदवले गेले. त्यांनी १९४७ सालापासून ११ हजारांहून अधिक गाणी विविध भाषेत गायली आहेत.

आता जरा पुरस्कारांच्या विक्रमांवर नजर टाकू. ‘कहो ना प्यार है’ हा चित्रपट आठवतोय का. तोच ज्यातून ऋतिक रोशनने सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटाने तब्बल १०२ पुरस्कार जिंकले होते. हा एक विक्रमही आहे. तसेच, २०२० मध्ये रिलीज झालेल्या मनासनामहा या तेलुगू शॉर्ट फिल्मला तब्बल ५१३ पुरस्कार मिळाले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

चेष्टा करताय व्हय! एका एपिसोडसाठी ‘एवढे’ लाख कोण घेतं का? वाचा सीआयडी कलाकार किती रुपये छापायचे

‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून करिअरची सुरुवात करणाऱ्या आदित्यला सीआयडीच्या ‘अभिजीत’ने मिळवून दिली ओळख

अश्लील म्हटल्याबद्दल जान्हवी कपूरला वाटते चिंता; म्हणाली, ‘अशा प्रश्नांमुळे माझं चारित्र्य…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here