Friday, September 20, 2024
Home बॉलीवूड ‘मी नेहमीच चुकीच्या व्यक्तीला डेट केले’, नीना गुप्ता यांनी सांगितला प्रेमाचा अनुभव

‘मी नेहमीच चुकीच्या व्यक्तीला डेट केले’, नीना गुप्ता यांनी सांगितला प्रेमाचा अनुभव

बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. चित्रपटांव्यतिरिक्त, नीना तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत ती तिच्या नात्याबद्दल चर्चेत आहे. आता नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीला रिलेशनशिपबाबत सल्ला विचारण्यात आला होता, मात्र नीनाने याबाबत कोणताही सल्ला देण्यास नकार दिला.

नीना म्हणाली, “रिलेशनशिपचा सल्ला देणारी मी चुकीची व्यक्ती आहे.” मी नेहमीच चुकीच्या लोकांना डेट केले आहे. कृपया मला विचारू नका, कारण मी खूप मूर्ख आणि वाईट उत्तर देईन.” नीनाने तिची मुलगी, डिझायनर-अभिनेत्री मसाबा गुप्ताच्या पहिल्या लग्नात झालेल्या चुकीची कबुली देखील दिली. मसाबाने सुरुवातीला चित्रपट निर्माता मधु मंतेनासोबत लग्न केले होते. नीनाने सांगितले की, मसाबाला सुरुवातीला लग्न करायचे नव्हते. मसाबाला त्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहायचे होते. मात्र, नीनाने लग्नाचा आग्रह धरला जो चूक ठरला आणि त्यांचे ब्रेकअप झाले.

मसाबा ही नीना आणि वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू विव रिचर्ड्स यांची मुलगी आहे. नीनाने चार्टर्ड अकाउंटंट विवेक मेहरासोबत लग्न केले आहे. यापूर्वी नीना म्हणाली होती की, पुरुष आणि स्त्रीमध्ये प्रेम नसते. हे सर्व वासनेने सुरू होते आणि मग जर तुम्ही एकत्र आलात तर तुम्ही एकमेकांबद्दल प्रेमळ बनता. मग ती सवय होऊन जाते. नीना गुप्ता म्हणाल्या की, तिला फक्त तिची मुलगी मसाबा हिचे प्रेम वाटते. इतर लोकांना कसे वाटले हे ती सांगू शकत नाही. त्यांना प्रेमाबद्दल काहीच कळत नाही.

याशिवाय नीना यांनी स्त्रीवादावरही आपले मत मांडले होते. ती म्हणाली होती, “माझा असा विश्वास आहे की अनावश्यक स्त्रीवादावर किंवा स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने आहेत या कल्पनेवर विश्वास ठेवण्याची गरज नाही. त्याऐवजी आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यावर आणि तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. तुम्ही गृहिणी असाल तर तुच्छतेने पाहू नका. ही एक महत्त्वाची भूमिका आहे. तुमचा स्वाभिमान वाढवा आणि स्वतःला लहान समजणे टाळा. हा मला मुख्य संदेश द्यायचा आहे. स्त्री-पुरुष समान नाहीत. ज्या दिवशी पुरुष गरोदर राहायला लागतील, तेव्हा आपण समान होऊ.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बप्पी लहिरींनी ‘अशी’ केली होती संगीत क्षेत्रातील करीअरला सुरुवात, ‘डिस्को डान्सर’ गाण्याने बनले बॉलिवूडचे किंग
‘या’ हॉलिवूड सिंगरकडे पाहून बप्पी दा झाले होते प्रभावित, विचार करायचे, ‘माझ्याकडेही पैसा असता…’

हे देखील वाचा