Friday, July 5, 2024

खऱ्या जीवनावर आधारित बनलेत ‘हे’ जबरदस्त चित्रपट; प्रेक्षकांनीही दर्शवला भरभरून प्रतिसाद

बर्‍याचदा बाॅलिवूड विश्वात पदार्पण करताना सेलिब्रिटी अनेक स्वप्न उराशी बाळगून येतात. मात्र, कित्येकदा त्यांची स्वप्ने आयुष्यातील काही घटनांमुळे अपुरीच राहतात. तसेच त्यांच्या आयुष्याला वेगळ्या वळणावर घेऊन जाता. परंतु, मनोरंजन विश्वातील काही कलाकारांच्या जीवनाशी संबंधीत काही गंमतीशीर किस्से आहेत. अशातच गोष्टींवर चित्रपट बनवून या कथा प्रेक्षकांसमोर मांडल्या जातात. बायोपिकची क्रेझ गेल्या काही वर्षांपासून प्रचंड वाढली आहे. बॉलिवूडमध्ये अनेक बायोपिक आहेत. जे प्रेक्षकांना प्रचंड आवडतात. बायोपिकमुळे अनेकदा प्रेक्षकांना एखाद्या व्यक्तीचे आयुष्य जाणून घेण्याची संधी मिळते. चला तर मग अशाच काही चित्रपटांविषयी जाणून घेऊ यात.

नीरजा
दिग्दर्शक राम माधवनी यांनी दिग्दर्शित केलेला ‘नीरजा’ हा चित्रपट एक एअर होस्टेसच्या जीवनावर आधारित आहे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पॅन एम फ्लाईट ७३ चे अपहरण केले होते. ही घटना १९८६ मध्ये घडली. त्यावेळी नीरजाने ३५९ प्रवाशांचे प्राण वाचवले. मात्र, या घटनेनंतर तिचा मृत्यू झाला. तिच्या या धाडसाची कथा ‘नीरजा’ या चित्रपटातून दाखवण्यात आली. या चित्रपटात सोनम कपूरने मुख्य भूमिका साकारली आहे.

दंगल
दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी ‘दंगल’ हा चित्रपट दोन फोगाट बहिणींच्या जीवनावर आधारित कथेवर बनवला आहे. महावीर सिंग फोगाट यांच्या दोन मुली गीता आणि बबिता या भारताच्या पहिल्या जागतिक स्तरावरील कुस्तीपटू आहेत. या चित्रपटात महावीर फोगाटची भूमिका आमिर खानने साकारली आहे. त्याचवेळी गीता आणि बबिताच्या भूमिकेत फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा दिसल्या.

मांझी- द माउंटेन मैन
‘मांझी- द माउंटेन मैन’ हा चित्रपट प्रेम कथेवर आधारित आहे. या चित्रपटात प्रेमासाठी माणूस कोणत्याही थराला जावू शकतो हे दाखवण्यात आले आहे. दशरथ मांझीने आपल्या पत्नीवरच्या प्रेमासाठी हातोडीने डोंगर फोडला आहे. ही अनोळखी प्रेमकथा दिग्दर्शक केतन मेहता यांनी प्रेक्षकांसमोर मांडली. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिका साकारताना दिसला.

एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी
भारती क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने मैदानावर अशी जादू केली, ज्याची भारतीय २८वर्षींपासून वाट बघत होते. २०११ मध्ये महेंद्रसिग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने विश्वचषक जिंकले. त्याच्या आयुष्यातील अशा अनेक कथा होत्या, त्या अनेकांना माहिती नव्हत्या.

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यावर या चित्रपटाला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या चित्रपटात दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतने धोनीची भूमिका साकारली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-जेव्हा अवॉर्ड मिळताच अमरीश पुरींसोबत हस्तांदोलन करायला विसरल्या नीना गुप्ता; व्हायरल होतोय जुना व्हिडिओ

-KBC: ‘शानदार शुक्रवार’च्या भागात ‘या’ खेळाडूंनी लावले चारचांद, अमिताभ यांना अश्रू अनावर

-Bigg Boss OTT: राकेश अन् शमिताच्या वाढत्या जवळीकतेबद्दल बोलली पूर्व पत्नी, ‘अशी’ दिली प्रतिक्रिया

हे देखील वाचा