मागच्या वर्षी भारतात कोरोनाने एन्ट्री केली आणि काही दिवसातच संपूर्ण भारत बंद झाला. नोकरी, उद्योग करणारे सर्व लोकं घरून काम करू लागले. मनोरंजनसृष्टी तर संपूर्ण थांबूनच गेली. सर्व कलाकार आणि जनता घरातच कैद झाली. इतिहासात पहिल्यांदाच संपूर्ण जनता घरात बंदिस्त झाली. आता २४ तास अनेक महिने घरात राहायचे होते. त्यामुळे प्रत्येकाच्या हातात भरपूर वेळ होता. सर्वानीच त्यांच्या सोयीने हा वेळ सदुपयोगी लावला.
अभिनेत्री नेहा धुपियाने देखील हा लॉकडाऊन सार्थकी लावला आहे. लॉकडाऊनचा हा तब्बल ८ महिन्यचा काळ तिने स्वतःसाठी देत तिने अटींचे तब्बल २१ किलो वजन कमी केले आहे. आपल्याकडे अनेक कलाकारांना बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागते. नेहमी बॉडी शेमिंग विरोधात अनेक जणं कायम त्यांचे मतं मांडत असतात, मात्र जेव्हा खरी वेळ येते या विरोधात उभे राहण्याची तेव्हा पुन्हा हेच लोकं बॉडी शेमिंग करतात दिसतात.
अभिनेत्री नेहा धुपिया देखील मागच्या काही महिन्यांपासून बॉडी शेमिंगला बळी पडत होती. मात्र तिने या लॉकडाउनचा उपयोग करत तिने तिचे २१ किलो वजन कमी केले आहे. नेहा नेहमीच तिच्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. ती अनेकदा ट्रोलर्सला सडेतोड उत्तरं देतानाही दिसत असते. मात्र ह्यावेळेस हे ट्रोलिंग नेहाच्या पथ्यावर पडले आहे. तिने ते ट्रोलिंग सकारत्मक घेत स्वतःमध्ये एक चांगला बदल घडवून आणला आहे.
नेहाने २०१८ मध्ये तिच्या मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही समस्या आणि शरीरातील बदलांमुळे तिचे २३/२५ किलो वजन वाढले होते. त्यामुळे अनेकांनी तिला ट्रोल केले. मात्र तिने या ८ महिन्यांच्या काळात २१ किलो वजन कमी केले आहे. नेहाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, ‘माझे वजन वाढल्याचा माझ्यावर कोणतंच नकारत्मक परिणाम झाला नाही. मात्र मी माझ्यासाठी माझ्या फिटनेससाठी वजन कमी केले आहे. खूप कमी स्त्रीया अशा असतात की, प्रेग्नेंसीमध्ये त्यांचे वजन वाढत नाही. माझे देखील २५ किलो वजन वाढले होते. हे कमी जाण्यासाठी माझ्यासमोर लॉकडाउनच्या निमित्ताने एका आयती संधी अली होती. मी तिचा फायदा उठवत माझ्यात हा मोठा बदल केला.”










