रोहित शेट्टीने सर्वाना सध्या एक सरप्राईज दिलं आहे. हे सरप्राईज म्हणजे ‘खतरों के खिलाडी 15’ चा नवीन प्रोमो सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे आणि त्यामध्ये मॉर्न मॉर्केल दिसतो. मॉर्न मॉर्केलच्या एन्ट्रीने सर्वजण थक्क झाले आहेत. कारण यात तो सर्वानां आव्हान देतो आणि त्यामुळे आता कसे जिंकायाचे असा सर्वाना प्रश्न पडला आहे. हा लोकप्रिय स्टंट-आधारित रिॲलिटी शो ‘डर का नया दौर’ या थीमसह परत येत आहे.
या शो दरम्यान अनेक स्टंटचा सामना करावा लागेल आणि यातील एक अनोखा टास्क म्हणजे या दरम्यान मॉर्न मॉर्केलने जो चेंडु टाकला असेल तो स्पर्धकांना पकडावा लागेल. पण हो स्टंट तेवढा सोपा असणार नाही. हा स्टंट पूर्ण करण्यासाठी स्पर्धकांना या माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूच्या वेगवान गोलंदाजीचा सामना करावा लागणार आहे. या टास्क मुळे स्पर्धेला एक नवीन वळण मिळणार आहे. आणि हा सामना पाहण्यासाठी स्पर्धेक उत्सुक आहेत. या नवीन सीझनमध्ये अनेक आव्हाने, थरार, अनेक आश्चर्यकारक आणि दमदार क्षण पाहायला मिळतील.
या सीझन मध्ये गौरव (gaurav)खन्ना, अविनाश मिश्रा, फरहाना भट्ट, शगुन शर्मा, अविका गोर, ओरहान अवतरामानी म्हणजेच ओरी, हर्ष गुजराल, जस्मिन भसीन, रुबिना दिलैक, करण वाही, ऋत्विक धनजानी, रुहानिका धवन आणि विशाल आदित्य सिंग यांसारखे स्पर्धक पाहायला मिळतील. तर या सीझनचा पहिला भाग 1 ऑगस्ट 2026 रोजी प्रसारित होईल आणि तो दर शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता कलर्स आणि जिओ हॉटस्टारवर दाखवला जाईल.
‘जना नायकन’च्या कमाईला ब्रेक? सहाव्या दिवशी जमा झाले केवळ इतके कोटी










