×

गायक रोहनप्रीतच्या थेट रूममध्ये चोरी; आयफोन, स्मार्टवॉच, डायमंड रिंगसह रोख रक्कम लंपास

प्रसिद्ध गायिका नेहा कक्करचा (Neha Kakkar) पती पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगच्या (Rohanpreet Singh) हॉटेल रूममधून अनेक महागड्या वस्तू चोरीला गेल्या आहेत. रोहनप्रीत सिंग हिमाचल प्रदेशातील मंडी येथील एका हॉटेलमध्ये थांबला होता. तेथून त्याचा आयफोन, स्मार्टवॉच, डायमंड रिंग आणि रोख रक्कम चोरीला गेली आहे. मंडीच्या एसपी शालिनी अग्निहोत्री यांनी सांगितले की, या प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.

खरं तर, नेहा कक्करचा पती रोहनप्रीत मंडीतील एका मोठ्या हॉटेलमध्ये थांबला होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शुक्रवारी (१३ मे) रात्री तो झोपला तेव्हा सर्व काही तिथेच होते. पण शनिवारी (१४ मे) सकाळी जेव्हा तो उठला, तेव्हा हॉटेलच्या रूममधील टेबलावर ठेवलेल्या वस्तू गायब होत्या. यानंतर रोहनप्रीतने पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, हॉटेल कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. याशिवाय हॉटेलमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचीही पोलिस चौकशी करत आहेत. (neha kakkar husband punjabi singer rohanpreet singh personal belongings stolen)

View this post on Instagram

A post shared by Neha Kakkar (Mrs. Singh) (@nehakakkar)

दोन दिवसांपूर्वी नेहा कक्करने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती रोहनप्रीतसोबत हॉटेलच्या रूम दिसत आहे. व्हिडिओमध्ये दोघेही चहा- कॉफी पिताना दिसत आहेत. नेहा कक्करने २४ ऑक्टोबर २०२० रोजी रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले होते. दोघांच्या वयात खूप अंतर आहे, पण प्रेम असेल तेव्हा वयाच्या अंतराचा काहीच फरक पडत नाही. दोघांची जोडी त्यांच्या चाहत्यांनाही खूप आवडते. ही गायक जोडी चाहत्यांसाठी सोशल मीडियावर अनेकदा व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post