Friday, January 16, 2026
Home टेलिव्हिजन बापरे! नेहा कक्करने स्पर्धकाला पाहून जज करण्यास दिला नकार, कारण ऐकून बसेल धक्का

बापरे! नेहा कक्करने स्पर्धकाला पाहून जज करण्यास दिला नकार, कारण ऐकून बसेल धक्का

सोनी टीव्हीच्या सिंगिंग रिअ‍ॅलिरटी शो ‘इंडियन आयडॉल 13’ ने छोट्या पडद्यावर धमाकेदार पुनरागमन केले आहे. शनिवारी, 10 सप्टेंबर रोजी त्याचे भव्य पदार्पण झाले. ‘इंडियन आयडॉल 13’ मध्ये नेहा कक्कर(Neha Kakkar), विशाल ददलानी(Vishal Dadlani) आणि हिमेश रेशमिया(Himesh Reshammiya) जज म्हणून दिसली. मात्र, शो सुरू झाल्यानंतर सोशल मीडियावर एक प्रोमो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये नेहा कक्कर स्पर्धक विनीत सिंगला पाहून आश्चर्यचकित झाली होती.

विनीत एक शोचा विजेता असल्याने ती त्याला जज करू शकत नाही असा दावा करताना ते व्हिडिओमध्ये दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या रिअ‍ॅलिटी शोच्या प्रोमोमध्ये विनीत हातात गिटार घेऊन स्टेजवर येतो. जिथे नेहा त्याला पाहून आश्चर्यचकित झाली. त्याचबरोबर ती खूप आनंदी आहे. यादरम्यान नेहाने खुलासा करताना सांगितले की, ‘त्यापूर्वी विनीत सिंग एका शोमध्ये आला होता आणि तो शोचा स्टार बनला होता. म्हणूनच मी तुला जज करू शकत नाही.

 

View this post on Instagram

 

नेहाच्या अशा गोष्टी ऐकून विनीत भावूक होतो. यानंतर विनीत म्हणतो की, नेहा आज जिथे आहे ती तिच्या स्वत: च्या मेहनतीमुळे आहे. विनीत पुढे म्हणाला, नेहा तिच्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचली आहे. तिनेही मला परिक्षण करावे अशी माझी इच्छा आहे. व्हिडिओच्या शेवटी नेहा म्हणते, ‘विनीत तू गा…’. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोनी टीव्हीच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. शेअर करताना निर्मात्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, जज नेहा तिच्या जुन्या मित्राला भेटली. तेही इंडियन आयडॉलच्या मंचावर.

इंडियन आयडॉल सीझन 13 चा पहिला भाग ऑडिशन राउंड होता, जिथे हजारो स्पर्धक सिंगिंग रिअ‍ॅलिटी शोमध्ये नशीब आजमावण्यासाठी उपस्थित होते. एपिसोडची सुरुवात एका कॉन्सर्ट स्टेडियमसारख्या सेटअपमध्ये परिक्षकांच्या परिचयाने झाली. शोचा पहिला एपिसोड थोडा मनोरंजक आणि सर्वांनाच भावनिक करून गेला. आदित्य नारायण हा शो होस्ट करत आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
दारुच्या ब्रॅंन्डची जाहिरात नाकारल्यानंतर आली धमकी, अभिनेत्याचे उत्तर ऐकून तुम्हीही कराल कौतुक

‘तिला पाहुन आजही येतात डोळ्यात अश्रू येतात’, नाना पाटेकरांनी सांगितली ‘या’ अभिनेत्रीसोबतची लवस्टोरी
‘ब्रह्मास्त्र’चे दोन दिवसाचे कलेक्शन पाहून बरळली कंगना; म्हणाली, ‘मला करणचा इंटरव्यू घ्यायचा आहे’

हे देखील वाचा