Friday, July 12, 2024

बकऱ्यांना चारा चारताना अक्षय कुमारचा व्हिडिओ व्हायरल, चाहत्यांना भावले अभिनेत्याचे प्राणीप्रेमी

अक्षय कुमारचा चाहतावर्ग फार मोठा आहे. अक्षय कुमारला बॉलिवूडमधील ‘खिलाडी’ म्हटलं जातं. नुकताच त्याने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये अक्षय कुमार बकऱ्यांना चारा देताना दिसत आहे. या व्हिडिओमधून अक्षय कुमारने एक खास संदेश दिलेला आहे. हा व्हिडिओ बघून चाहत्यांना अक्षय कुमारचे कौतुक वाटले तसेच अक्षय कुमारचे प्राण्यांवर असलेले प्रेम त्यांना जास्त भावले आहे.

अक्षय कुमार (akshay kumar) शरीराला फार महत्व देतो. आपल्या  कामकाजातून वेळ काढून तू शरीराला थोडासा वेळ देतो. काही दिवसांपूर्वी त्याने आपल्या परिवारासाठी वेळ काढला होता, तेव्हा दिसून आलं की, तो छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानत होता.  त्यांनी सोशल मीडियावर बकऱ्यांना चारा देतानाचा व्हिडिओ नुकताच शेअर केला आहे. या छोट्या गोष्टीतही आनंद शोधत होता. व्हिडिओमार्फत त्याने एक संदेश दिलेला आहे.

अक्षय कुमार सुट्टीसाठी आपल्या परिवारासोबत गेलेला असताना त्याने एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये तो बकऱ्यांना चारा घालताना दिसत आहे आणि हे काम करताना त्याला फार आनंद होत आहे ते दिसून आले. या व्हिडिओच्या खाली कॅप्शनमध्ये तो लिहितो की, “छोट्या छोट्या गोष्टीमध्येच फार आनंद लपलेला आहे. या आनंदाचा आस्वाद घ्या. या आयुष्यात दिलेल्या प्रत्येक एका दिवसासाठी देवाचा खूप आभारी आहे.” या व्हिडिओमध्ये त्याच्याच सिनेमाचं ‘तेरी मिट्टी’ हे गाणं लावले आहे.

अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेता आहे. त्याने अनेक चित्रपटात काम करून नाव कमावले आहे. नुकतेच काही दिवसांपूर्वी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत होती.

हेही वाचा :

 

 

हे देखील वाचा