Thursday, July 18, 2024

गाडीतून उतरली अन् रस्त्यावरच करू लागली डान्स, पाहा बोल्ड अभिनेत्रीचा व्हायरल व्हिडिओ

निया शर्मा (Nia Sharma) ही टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील सर्वात चर्चेत असलेली अभिनेत्री आहे. आशियातील सर्वात सेक्सी महिलांच्या यादीत अनेकवेळा समाविष्ट झालेली निया शर्मा, तिच्या फोटो आणि व्हिडिओंमुळे सोशल मीडियावर अधिराज्य गाजवते. पुन्हा एकदा नियाचा असा व्हिडिओ समोर आला आहे, जो पाहून नेटकरी आश्चर्यचकित झाले आहेत.

डान्समधून उतरून करू लागली डान्स
निया शर्माने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती क्रॉप शर्टमध्ये दिसत आहे. यासोबतच तिने काळी पँट घातली आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती कारमधून खाली उतरते आणि तिच्या नुकत्याच रिलीझ झालेल्या ‘फुंक ले’ गाण्यावर डान्स करू लागते. (nia sharma started dancing after stopping the car on the middle road people enjoyed watching video)

कौतुक ऐकणे वाटते विचित्र!
निया म्हणते की, तिच्या सौंदर्य किंवा फिगरबद्दल प्रशंसा ऐकून तिला अस्वस्थ वाटते. नियाने अलीकडेच एका संभाषणात खुलासा केला की, तिला अजूनही अशा कमेंटला उत्तर देण्याची सवय नाही. ती म्हणाली, “कधीकधी तुम्हाला फक्त समोरच्या व्यक्तीने तुमची स्तुती केल्याबद्दल आभार मानावे लागतात. पण असो, मी ते करू शकत नाही. मला ते पचत नाही. मला कोणीतरी सांगते की निया तू खूप सुंदर दिसतेस, खूप हॉट आहेस. मी हे असे घेते, जसे की तो मला चुकीच्या गोष्टी का सांगण्याचा प्रयत्न करीत आहे. मला हे सर्व समजत नाही.”

नियाने ‘काली – एक अग्निपरीक्षा’, ‘एक हजारों में मेरी बहना है’ आणि ‘जमाई राजा’ सारख्या अनेक मालिकामध्ये काम केले आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा