×

‘दुसऱ्यांना काय वाटतं याच्याशी माझा संबंध नाही,’ कपड्यावरून ट्रोल केल्यामुळे मलायकाने केला संताप व्यक्त

मलायका अरोरा कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे नेहमीच चर्चेत असते. अर्जुन कपूरबरोबर सध्या ती रिलेशनमध्ये आहे. मलायका सोशल मीडियावर अनेकवेळा ट्रोल होत असते. एका मुलाखतीत मलायकाने ट्रोल केल्याबद्दल नेटकऱ्यांना खडेबोल सुनावले. स्त्रियांना काय घालावं आणि काय घालू नये हा त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे. असे तिचे मत आहे.

या मुलाखतीत (malaika arora) मलायका म्हणाली की, “स्त्रियांना त्यांनी परिधान केलेला ड्रेस, नेकलेस याच्यावरून नेहमी बोलतात. प्रत्येकजण प्रत्येकवेळी आपापल्या परीने बोलत असतात. मी त्या लोकांच्या म्हणण्यानुसार नाही जगू शकत. मी कोणते कपडे घालायचे कोणते कपडे घालू नयेत हा सर्वस्वी माझा प्रश्न आहे. मला जर एखादे कपडे आवडत असतील, तर ते मी घालणार. ते दुसऱ्यांना कसे वाटतात काय वाटतं आहे याच्याशी माझा संबंध नाही. मला जे योग्य वाटते. ते मी नक्कीच करेन.”

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायकाने पुढे मुलाखतीत हे देखील सांगितले की, “जेव्हा आमचा घटस्फोट झाला, तेव्हा या प्रसंगातून माझी मुलं कशी बाहेर निघतील लोकं काय म्हणतील या गोष्टीचा जास्त विचार करत होते. तू प्रवास माझ्यासाठी खूप खडतर होता. तू प्रवास करत असताना माझ्या मुलांची मला जास्त चिंता होती. परंतु तेव्हा पण मी मला जे योग्य वाटले ते मी केले.”

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

मलायका ही बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींनपैकी एक आहे. तीने अनेक आयटम सॉन्गमध्ये डान्स केला आहे. तसेच ती एक मॉडेल देखील आहे. वयाच्या चाळिशीतही तिचा फिटनेस पाहण्यासारखा आहे. तिचे पहिले लग्न सलमान खानचा भाऊ अरबाज खानसोबत झाले होते. परंतु काही कारणांनी त्यांच्या घटस्फोट झाला. त्यांना एक मुलगा देखील आहे. घटस्फोटानंतर अर्जुन आणि मलायका रिलेशमध्ये आले. अर्जुन मलायकापेक्षा वयाने लहान आहे. त्यामुळे त्या दोघांना अनेकवेळा ट्रोल केले जाते.

हेही वाचा :

Latest Post