पत्रकाराने ‘नॅशनल क्रश’ रश्मिकाला ब्रेकअपबद्दल विचारलेल्या ‘त्या’ प्रश्नावर विजयची आगपाखड, अशी होती प्रतिक्रिया

News Reporter Asked Rashmika Mandanna About Her Breakup With Rakshit Shetty Vijay Deverakonda Gave Angry Reply


बॉलिवूडपासून ते टॉलिवूडपर्यंत सर्वच कलाकार नेहमीच आपले लग्न, लव्ह अफेअर्स आणि इतर बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत राहत असतात. सामान्य व्यक्तींप्रमाणे या कलाकारांनाही आपला राग अनावर होत असतो. मुलाखतीदरम्यान तर हे अनेकवेळा पाहायला मिळालं आहे. असेच काहीसे टॉलिवूडचा सुपरस्टार विजय देवरकोंडाबाबत झाले होते. त्यानंतर त्याचा राग दिसून आला होता.

अभिनेत्री रश्मिका मंदाना आज ‘नॅशनल क्रश’ म्हणून ओळखली जाते. ‘डिअर कॉम्रेड’ चित्रपटाच्या प्रमोशनल मुलाखतीदरम्यान रश्मिकाला एका पत्रकाराने रक्षित शेट्टीसोबतच्या ब्रेकअपबद्दल विचारले होते. त्यामुळे विजय देवरकोंडाची पत्रकारावर चांगलीच आगपाखड झाली होती.

विजयने यावर प्रतिक्रिया देत म्हटले होते की, “मला तुमचा प्रश्नसुद्धा माहित नाही. हे जाणून घेणे तुमचे काम नाही. जसे मला प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत, तसे तुम्ही अर्थपूर्ण प्रश्न विचारा.” यासोबतच रश्मिकानेही या प्रश्नावर आपले मत व्यक्त करत म्हटले होते की, “तुमचा प्रश्न खूप मोठा आहे, त्यामुळे मला समजला नाही.”

माध्यमांमध्ये असे वृत्त होते की, रश्मिका आणि रक्षित साखरपुडा करणार होते. परंतु अचानक दोघेही वेगळे झाले.

नुकतेच दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाचा ‘पुष्पा’ चित्रपटाची घोषणा झाली होती. हा चित्रपट १३ ऑगस्टला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहेत. या चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक सुकुमार हे आहेत. हा चित्रपट तेलुगु, तमिळ, हिंदी, कन्नड आणि मल्याळम यांसारख्या भाषेत रिलीझ केला जाणार आहे.

 

अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदानाव्यतिरिक्त या चित्रपटात धनंजय आणि सुनील दिसणार आहेत. या चित्रपटाचे निर्माते मिथ्री मूव्ही मेकर्स आणि मुत्तमशेट्टी मीडिया एकत्र मिळून याची निर्मिती करत आहेत. या चित्रपटाला देवी श्री प्रसाद यांनी संगीत दिले आहे. हा चित्रपट आंध्रातील टेकड्यांमध्ये लाल चंदनाची तस्करी आणि त्यासाठी सुरू असलेल्या एकत्रिकरणाची कहाणी सांगत आहे. या चित्रपटाची कहाणी एका व्यक्तीबद्दल सांगते, जी आपल्या लोभामध्ये बुडलेले आहे.

रश्मिकाबद्दल बोलायचं झालं, तिने तेलुगू, तमिळ चित्रपटांमध्ये चांगले नाव कमावले आहे. लवकरच ती आता बॉलिवूडमध्येही पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिचा ‘मिशन मजनू’ हा चित्रपट लवकरच येणार आहे.

 

या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-स्केटिंग करताना मराठमोळी जेनेलिया दुखापतग्रस्त, व्हिडिओ शेअर करत दिला प्रेरणादायी संदेश

-जेव्हा कपिलच्या लाईव्ह शोमध्ये घडतो असा काही प्रकार की, सर्वांनाच फुटतं हसू; पाहा मजेशीर व्हिडिओ

-वाह रे वाह! पावरी ट्रेंडमध्ये सहभागी झाले अनुपम खेर, वाढदिवस साजरा केला हटक्या अंदाजात


Leave A Reply

Your email address will not be published.