नुकताच बिग बॉस मराठी पाचव्या सीझन सुरुवात झाली आहे. रोज नवे नवे घरात ट्विस्ट बघायला मिळत आहे. यामुळे बॉस मराठी सीजन 5 गाजताना दिसतोय. दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली असून कालच्या भागात नॉमिनेशन कार्य पार पडले. यात निक्की तांबोळी, घनश्याम, पॅडी कांबळे, योगिता चव्हाण, सुरज चव्हाण, निखिल दामले हे स्पर्धक थेट नॉमिनेट झाले आहेत.
कलर्स मराठी वरून एक प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला. त्यात निकी व अरबाज डान्स करताना दिसत आहे. दादा कोंडकेंच्या हिल पोरी हिला या गाण्यावर निकी व अरबाज नाचताना दिसत आहे. यासाठी खास निकीने कोळी लुक केला आहे. हिरव्या रंगाची साडी व लाल रंगाचा ब्लाऊज तिने परिधान केला आहे. या व्हिडिओमध्ये दोघांची चांगलीच केमिस्ट्री दिसून येत आहे. दोघांचा हा परफॉर्मन्स घरातील इतर सदस्य एन्जॉय करत आहे.
या दोघांशिवाय अंकिता प्रभु – वालावरकर, निखिल दामले, योगिता चव्हाण, जान्हवी किल्लेकर, वर्षा उसगावकर, सुरज चव्हाण हे सुद्धा नाचताना दिसणार आहे. अभिजीत सावंत एक गाणे सादर करताना दिसणार आहे. त्याचबरोबर, आर्या सुद्धा रॅप करताना दिसणार आहे.
प्रेक्षकांसाठी या सर्व सदस्यांच्या कला पाहणे हे नक्कीच मनोरंजक ठरणार आहे. बिग बॉसच्या घरात नॉमिनेशन कार्य पार पडले असून, या आठवड्यात घराबाहेर कोण जाईल हे पाहणे नक्कीच मनोरंजक असणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
पॉलिटिक्स आहे रे सगळं! विनेश फोगटच्या बातमीवर अभिनेता समीर परांजपेची पोस्ट चर्चेत…
अनेकांनी मला वेळोवेळी नाकारलं …! तुषार कपूरने व्यक्त केली करियर विषयी खंत