अभिनेत्री नाही, तर निक्की तांबोळीला बनायचे होते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश; स्वत:च केला खुलासा


‘खतरों के खिलाडी ११’ची सुरुवात अगदी दिमाखात झाली आहे. शोच्या पहिल्याच भागात खतरनाक स्टंट्स सुरू झाले आहेत. ‘खतरों के खिलाडी ११’च्या पहिल्याच भागात अभिनेत्री निक्की तांबोळी बाहेर पडली आहे. निक्कीच्या खराब परफॉर्मन्समुळे तिच्यावर बाहेर जाण्याची नामुष्की ओढावली. याव्यतिरिक्त ‘बिग बॉस’ या शो मुळे निक्कीच्या लोकप्रियतेत अधिकच भर पडली आहे. निक्कीने एका मुलाखतीमध्ये तिच्याबद्दल आणि तिच्या करिअरबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.

तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले की, “माझा किंवा माझ्या परिवाराचा या क्षेत्राशी अजिबात संबंध नव्हता. मी डोंबिवलीमध्ये राहत होती, तेव्हा माझी आई मला रोज ५० रुपये पॉकेटमनी द्यायची. याच ५० रुपयांचा वापर मी डोंबिवली ते अंधेरी प्रवासासाठी करत होती. जिथे मी ऑडिशन देण्यासाठी जायची. मी रिक्षाने देखील प्रवास करायची. असा एकही दिवस नाही गेला, ज्या दिवशी मी रिजेक्ट झाली नाही. सुरुवातीचे दोन वर्ष मी खूप रिजेक्शनचा सामना केला. मात्र, माझ्या मेहनतीला यश मिळाले आणि मी २० वर्षाची झाली, तेव्हा मी माझी पहिली साऊथ फिल्म साईन केली होती. २३ वर्षाची होईपर्यंत मी तीन सिनेमे साईन केले होते.”

निक्कीला अभिनेत्री नाहीतर दुसऱ्या क्षेत्रात करिअर करायचे होते. यावर बोलताना निक्की म्हणाली, “मला एक अभिनेत्री नाही, तर सर्वोच्च न्यायालयाचे नायाधीश व्हायचे होते. मला खरं बोलायला खूप आवडते. मला हे देखील माहित आहे की, लोकांना खरं ऐकायला आवडत नाही. मी बिग बॉस १४ मध्ये देखील खरंच बोलायची, आणि मी नेहमी खऱ्याचेच समर्थन केले. मला कायद्यामध्ये आवड होती. मला सर्व बाजूंनी फक्त लोकांचीच मदत करायची होती. मात्र, हे क्षेत्र माझ्या नशिबात नव्हते.”

निक्कीचा जन्म महाराष्ट्रातील औरंगाबादमध्ये झाला. त्यानंतर ती आणि तिचा पूर्ण परिवार डोंबिवलीमध्ये आले. कॉलेज जीवनापासूनच निक्कीने तिच्या मॉडेलिंग करिअरला सुरुवात केली होती. ती टेलिव्हिजनवर अनेक जाहिरातींमध्ये देखील दिसली आहे. साऊथ चित्रपटांमधून तिने अभिनयात पदार्पण केले. आदिथ अरुण या अभिनेत्यासोबत तिने तेलुगू सिनेमा ‘चिकाती गाडिलो चित्तकोटुडु’ हा पहिला सिनेमा केला. त्यानंतर ती ‘कंचना ३’, ‘थिप्पारा मीसम’ आदी चित्रपटांमध्ये झळकली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-तुझी- माझी जोडी लाखात एक! सुपरस्टार राम चरणकडून पत्नीला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा; पत्नीचा आला ‘असा’ रिप्लाय

-भोजपुरी अभिनेत्री नीलम गिरीने बाथरूममध्ये केला आमिर खानच्या गाण्यावर डान्स; शॉर्ट ड्रेसमध्ये दिसतेय सुंदर

-काय सांगता! शाहरुख खानने मध्येच थांबवली त्याच्या ‘पठाण’ चित्रपटाची शूटिंग; सलमान खान आहे कारण?


Leave A Reply

Your email address will not be published.