पवन सिंगच्या ‘या’ गाण्यावर थिरकली नीलम गिरी, पाहायला मिळाल्या अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा


भोजपुरी कलाकार नेहमीच त्यांच्या गाण्यांमुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच चर्चेचा विषय  ठरत असतात. या कलाकारांचे व्हिडिओ, गाणे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहिले आहे. सध्या भोजपुरी गाण्यांना आणि कलाकरांना मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळत आहे. ही भाषा न येणाऱ्या प्रदेशात देखील भोजपुरी गाणे तुफान गाजतात. आकर्षक चाली आणि तोंडात सहज रुळणारे शब्द यामुळेच ही गाणी लोकांमध्ये हिट होत आहे.

भोजपुरी इंडस्ट्रीतील सुपरस्टार म्हणून ओळखला जाणारा अभिनेता म्हणजे पवन सिंग. पवन सिंगला ‘पॉवरस्टार’ म्हणून देखील ओळखले जाते. त्याच्या नावाप्रमाणे त्याचे सिनेमे आणि गाणी देखील पॉवरफुल असतात, आणि संपूर्ण देशात तुफान गाजतात. अगदी सहज या गाण्यांना कमी वेळात मिलियन व्ह्यूज मिळतात. पवन सिंगच्या गाण्यांवर लोकांचे प्रेम इतके जास्त आहे की, अनेक फॅन्स त्याच्या गाण्यांवर स्वतःचे अनेक व्हिडिओ बनवतात आणि सोशल मीडियावर पोस्ट करतात. याबाबतीत कलाकार देखील मागे नाहीत. अनेक कलाकार त्यांचे पवन सिंगच्या गाण्यांवर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर पोस्ट करतात आणि चर्चेत येतात.

नुकतेच भोजपुरीमधील ट्रेंडिंग गर्ल असलेल्या नीलम गिरीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर तिचा एक डान्स व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये ती पवन सिंगच्या ‘कसल कमरिया हो’ या गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये नीलमने काळ्या रंगाचा क्रॉप टीशर्ट घातला असून, तिचे सोनेरी केस सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. नीलमच्या या गाण्यावरील डान्स मुव्हज खूपच मादक आणि हॉट दिसत आहेत. तिच्या या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखापेक्षा अधिक व्ह्यूज आले असून सोबतच भन्नाट कमेंट्स देखील आल्या आहेत.

पवन सिंगचे ‘कसल कमरिया हो’ हे गाणे ‘पवन पुत्र’ या सुपरहिट चित्रपटातील आहे. हे गाणे देखील यूट्यूबवर तुफान व्हायरल झाले होते. वर्ल्डवाईड रेकॉर्ड्स भोजपुरीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवरून प्रदर्शित झालेल्या या गाण्यात पवन सिंगसोबत प्रियांका सिंग ही बोल्ड जोडी दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…


Leave A Reply

Your email address will not be published.