Sunday, February 23, 2025
Home बॉलीवूड ‘कुसू कुसू’च्या सेटवर नोरा फतेहीसोबत घडली ‘ही’ त्रासदायक घटना, ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट

‘कुसू कुसू’च्या सेटवर नोरा फतेहीसोबत घडली ‘ही’ त्रासदायक घटना, ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट

बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेहीचे ‘कुसु कुसू’ हे गाणे इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. हे गाणे यूट्यूबच्या ट्रेंडिंग लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर पोहोचले असून, रिलीझसोबतच या गाण्याने चाहत्यांच्या प्लेलिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. नोरा फतेहीने या म्युझिक व्हिडिओमध्ये अप्रतिम बेली डान्स केला आहे, ज्यामुळे प्रत्येकजण प्रभावित झालेला पाहायला मिळाला. पण तुम्हाला माहित आहे का, की या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नोरा तिच्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट अनुभवातून गेली आहे.

‘कुसू कुसू’च्या सेटवर नोरासोबत घडले ‘असे’ काही
नोरा फतेही म्हणाली की, “चित्रपट ‘सत्यमेव जयते २’चे गाणे ‘कुसू कुसू’च्या सेटवर, मी आजपर्यंतच्या सर्वात वाईट अनुभवातून गेले.” नोरा फतेहीने सांगितले की, सेटवर अतिशय टाइट ड्रेसमुळे तिचा जीव गुदमरत होता. ती म्हणाली की, हा तिचा आजपर्यंतचा सर्वात वाईट अनुभव आहे. (nora fatehi reveals horrible experience on satyamev jayate 2 song kusu kusu shooting set)

घुटत होता नोरा फतेहीचा दम
गाण्यातील नोरा फतेहीच्या बॉडीसूटची ओढणी तिच्या गळ्यातील हाराला जोडलेली होती. जड घुंगटच्या वजनामुळे नोराच्या गळ्यात हार अडकला होता, त्यामुळे तिचा दम घुटत होता. एवढेच नाही, तर अभिनेत्रीच्या मानेवर ताण आल्याचे अनेक निशाणही आले आहेत.

चालूच राहिली शूटिंग
शूटिंगसाठी वेळ खूप कमी होता, त्यामुळे तिने गाण्याचे शूटिंग सुरू ठेवले आणि टेक पूर्ण केल्यानंतरच ब्रेक घेतला. मिलाप जावेरी दिग्दर्शित ‘सत्यमेव जयते २’ हा २०१८ साली प्रदर्शित झालेल्या ‘सत्यमेव जयते’ चित्रपटाचा सिक्वेल आहे. हा चित्रपट २५ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीझ होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे

हे देखील वाचा