अबब! ‘ओ शेठ तुम्ही नादच केला थेट’ गाण्याचा युट्यूबवर धुमाकूळ, २० दिवसांत मिळालेत एवढे व्ह्यूज


मागील एक आठवड्यापासून गल्ली बोळात, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, फेसबुक सर्वत्र एकच नाद घुमतोय तो म्हणजे ‘ओ शेठ तुम्हीच नादच केला थेट.’ या गाण्याने समस्त तरुण वर्गाला अक्षरशः वेड लावले आहे. आज प्रत्येकाच्या ओठावर ‘ओ शेठ’ या गाण्याची चर्चा आहे. शांताबाई, आला बाबुराव, आमदारनंतर आता ओ शेठने सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. या गाण्याने इतर सर्व गाण्यांना मागे टाकले आहे. इतर गाण्यांकडे थोडा कानाडोळा करून प्रेक्षक या गाण्याला जोरदार प्रतिसाद देत आहेत. या गाण्याची खास गोष्ट म्हणजे गाण्याचे बोल हृदयाला भिडणारे आहेत. आजकाल प्रत्येक गल्ली बोळात एक तरी शेठ असतो. त्याला समर्पक असे हे गाणे आज तरुणांना ऐकण्यासाठी प्रवृत्त करत आहे.

खरं तर हे गाणे २७ जून, २०२१ ला ‘डीजे प्रनिकेत ऑफिशिअल’ या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे. मागच्या आठवड्यात या गाण्याला जास्त व्ह्यूज मिळाले नव्हते. तसेच या गाण्याची चर्चा देखील नव्हती. पण या आठवड्यात या गाण्याची लोकप्रियता आणि व्ह्यूज गगनाला भिडले आहेत. या गाण्याचे संगीत आणि बोल असे आहेत जे कोणालाही नाचायला प्रवृत्त करतील. (O Sheth trending song on You tube get 4.6 milian views in one week)

या सुपरहिट गाण्याचे बोल संध्या केशे आणि प्रनिकेत खुने यांनी लिहिले आहेत. याच दोघांनी या गाण्याला संगीत देखील दिले आहे. उमेश गवळी यांनी हे गाणे गायले आहे. या गाण्याच्या लोकप्रियतेचा अंदाज आपण इथूनच लावू शकतो की, या गाण्याला केवळ दोन आठवड्यात ४.६ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्यूब युजर या गाण्यावप मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दर्शवत आहेत.

या गाण्याने एका आठवड्यात आख्या सोशल मीडियावर आपले नाव गाजवले आहे. कारण जिथे बघाल, तिथे केवळ या गाण्याचे बोल आणि गाण्याची चर्चा ऐकू येत आहे. या आधीदेखील मराठीमध्ये अनेक गाणी प्रदर्शित झाली आहेत. परंतु या गाण्याने प्रेक्षकांचे खास लक्ष वेधून घेतले आहे. खास करून तरुण वर्ग ‘ओ शेठ’ कडे झेपावला आहे.

या गाण्याची लोकप्रियता पाहून हे गाणे मराठीमधील इतर सुपरहिट गाण्यांचे रेकॉर्ड लवकरच ब्रेक करेल असा आनंद वर्तवला जात आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गणपती बाप्पा मोरया!’ लग्नानंतर राहुल वैद्यने मंत्रमुग्ध आवाजात केली गणेशाला प्रार्थना; व्हिडिओ होतोय इंटरनेटवर व्हायरल

-तब्बल १२०० किमीचा सायकल प्रवास करत सोनू सूदला भेटायला आला चाहता; त्याचे अनवाणी पाय बघून अभिनेत्याने…

-‘लिहिण्यास काही नाही’, रात्री २ वाजता केलेल्या ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर


Leave A Reply

Your email address will not be published.