‘लिहिण्यास काही नाही’, रात्री २ वाजता केलेल्या ट्वीटमुळे अमिताभ बच्चन ट्रोलर्सच्या निशाण्यावर


बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे एक सदाबहार व्यक्तिमत्व आहे. ते सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. ते सोशल मीडियावर त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीची अपडेट देत असतात. त्यांचा चाहतावर्ग देखील भरपूर आहे. त्यांचे चाहते नेहमीच त्यांच्याबाबत जाणून घेण्यासाठी उत्सुक असतात. ते नेहमीच वेगवेगळ्या मुद्यांवर त्यांचे मत मांडत असतात. त्यामुळे ते चर्चेत असतात. बिग बी यांनी शनिवारी (१७जुलै) रात्री २ वाजता एक ट्वीट केले आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी त्यांना जोरदार ट्रोल केले आहे. (Amitabh Bachchan get troll after his late night tweet)

अमिताभ बच्चन यांनी केलेल्या या ट्वीटमध्ये लिहिले आहे की, “लिहिण्यास काहीही उरले नाही.” या ट्वीटनंतर सकाळपासून ते सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहेत. सोशल मीडियावर त्यांना नेटकरी ट्रोल करत म्हणत आहेत की, “लिहिण्यास काही नाही, तर वाढती महागाई आणि पेट्रोलच्या भावावर काहीतरी लिहा.”

काही युजरने तर २०१२ सालचे त्यांचे ट्विट काढले, जे त्यांनी पेट्रोलच्या वाढत्या भावावर केले होते. एक युजरने तर त्यांच्यासमोर लिहिण्यासाठी काही मुद्दे देखील ठेवले आहेत. ते मुद्दे सांगताना त्याने लिहिले आहे की, “अमिताभ बच्चन जी लिहिण्यासाठी खूप काही आहे.
१) देशातील अनेक राज्यात आलेल्या पूर परिस्थिती बाबत लिहा.
२) देशात वाढत असणाऱ्या महागाईबाबत लिहा.
३) देशात वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या भावावर लिहा .
४) देशात वाढणाऱ्या गॅस सिलेंडरच्या किमतीबाबत लिहा.”
अशा प्रकारे त्यांच्या या ट्विटमुळे त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.

अमिताभ बच्चन या दिवसात नीना गुप्ता यांच्यासोबत ‘गुडबाय’ या चित्रपटाची शूटिंग करत आहेत. कोरोनामुळे या चित्रपटाची शूटिंग बंद होती. परंतु आता परिस्थिती ठीक झाल्यामुळे पुन्हा शूटिंग सुरू झाली आहे. या चित्रपटात नॅशनल क्रश रश्मिका मंदाना देखील असणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘गणपती बाप्पा मोरया!’ लग्नानंतर राहुल वैद्यने मंत्रमुग्ध आवाजात केली गणेशाला प्रार्थना; व्हिडिओ होतोय इंटरनेटवर व्हायरल

-‘ये हवायें, गुनगुनाए, पूछे तू है कहाँ!’ शिवानी बावकरच्या दिलखेचक अंदाजावर चाहते फिदा

-कॅटरिना कैफ अन् विक्की कौशल लवकरच लग्न करणार?? सलमान खानचा स्टायलिस्ट एशले रेबेलोकडून मिळाले संकेत


Leave A Reply

Your email address will not be published.