Sunday, April 14, 2024

राजामौलींमुळे चित्रपटसृष्टीची नासाडी? बॉलिवूडमधील ‘या’ दिग्गज अभिनेत्रीने ‘आरआरआर’ चित्रपटावर केली टिका

दाक्षिणात्य सुपरस्टारर दिग्दर्शक एसएस राजामौली यांचा ब्लॉकबास्टर चित्रपट आरआरआर (दि, 25 मार्च 2022) रोजी प्रदर्शिता झाला होता. या चित्रपटाने भारतातच नाही तर परदेशताही धमाल केली आहे. बॉक्सऑफिसवर चित्रपटाने चांगल्या कमाईसोबतच सगळे रेकॉर्ड मोडीत काढले होते. त्याशिवाय आरआरआरने अनेक अवॉर्डही आपल्या नावावर केले आहेत. अनेक प्रेक्षकांच्या मानावर राज्य करणारा चित्रपट बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक यांना आवडला नाही. त्याशिवाय त्यांच्या मते चित्रपट रिग्रेसिव म्हणजेच अर्थपूर्ण नाही.

बॉलिवूडमधीाल प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिग्दर्शिका रत्ना पाठक (Ratna Pathak) या सतत आपल्या अभिनयामुळे आणि बिंदास्त वक्तव्यासाठी ओळखल्या जातात. त्यांनी अनेकदा बॉलिवूडमधील काही गोष्टींवर बिंदास्त वक्तव्य केले आहे. ज्युनिअर एनटीआर (N. T. Rama Rao Jr.) आणि राम चरण (Ram Charan) स्टारर चित्रपट आरआरआर मध्ये या दोन कलाकारांनी मुख्य भूमिकेत असून चित्रपटाने जगभरात 1200 कोटीचा गल्ला जमवला आहे. त्याशिवाय ग्लोबल नामांकन आणि क्रिटिक्स चॉईस अवॉर्डसाठी पाच नामांकन प्राप्त केले आहेत. चित्रपटामध्ये एनटीआर आणि राम चरण यांना वास्तविक जिवनातले क्रांतिकारी अल्लूरी सीताराम राजु आणि कोमाराम भीमच्या स्वरुपात दाखवले आहे. मात्र, रत्ना पाठक याच्या मते जोपर्यत चित्रपट निर्माता त्यांच्या कामाला गंभीरपणे नाही बघणार तोपर्यंत प्रेक्षकांना एसएस राजामौली (SS Rajamouli) सारखे चित्रपट पाहावे लागणार आहेत.

रत्ना पाठक यांनी एका पुस्तक प्रदर्शनावेळी दिलेल्या मुलाखतीरम्यान पुढे सांगितले की, “आरआरआर सारखे चित्रपट आज खुप लोकेप्रिय आहेत. मात्र, हा चित्रपट रिग्रेसिव म्हणजेच परिपूर्ण नाही. हा चित्रपट मागच्या काळात घेऊन जात आहे मात्र, आपल्याला पुढच्या काळाकडे पाहिले पाहिजे. मला वाटत आहे की, आम्ही जे काही करत आहेत चे चांगलं आहे. कारण आम्ही लोकतंत्राची जननी भारताचा भाग आहोत. जोपर्यत चित्रपट निर्माता आपल्या कामाला गंभिरपणे करणारा नाही तर आपल्याला आरआरआर सारखे चित्रपट पाहावे लागणार आहेत, पण आम्हाला वाद आवडत नाहीत. याच्यामुळे आमच्या आहंकाराल दु:ख पोहचते. असे वातावरण एवढ्या मोठ्या लोकांनी निर्माण केले आहे आणि दुर्भाग्याने आम्हाला ते स्वीकार करावा लागत आहे.”

ratna pathak
रत्ना पाठक यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी गुजराती चित्रपट ‘कच्छा एक्सप्रेस’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याशिवाय अभिनेत्री या चित्रपटाचे जोरदार प्रमोशनही करत आहे. यापूर्वी त्यांनी ‘पठाण‘ (Pathan) चित्रपटावर टीका करणाऱ्यांना सडेतोट उत्तरही दिले होते.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘प्रत्येकाला स्वतःचे हक्क…’, मिलिंद सोमनने 14 वर्षापूर्वीच्या अनुभवानुसार ‘पठाण’ चित्रपटावर व्यक्त केले मत

अभिनेत्रीच नव्हे उत्तम चित्रकारही! संस्कृतीचे लेटेस्ट फाेटाे पाहिलेत का?

हे देखील वाचा