Friday, March 29, 2024

बाबो! चक्क खऱ्या फिल्मफेअरमध्ये झालेलं ‘ओम शांती ओम’ चित्रपटाचे शूटिंग

मंडळी शाहरुख खान आणि दिपीका पदुकोण हे नाव घेतलं तरी तुम्हाला पटकन काय समोर येत, असा प्रश्न विचारला, तर तुमच्यापैकी अनेकांचं उत्तर असेल ओम शांती ओम चित्रपट. २००७ साली आलेल्या या चित्रपटाने चांगलाच धुमाकूळ घातलेला. चित्रपटातील डायलॉग तर इतके फेमस झालेले की आजही तुम्ही कधी तरी म्हणत असाल अगर किसी चीज को दिल से चाहो बरोबर ना… फराह खान दिग्दर्शित या चित्रपटाबद्दल अशाही काही गोष्टी आहेत, ज्या ऐकून तुम्ही थक्क व्हाल. कोणत्या आहेत, त्या गोष्टी चला पाहूया.

ओम शांती ओम हा चित्रपट दिपीका पदुकोणच्या बॉलिवूड पदार्पणासाठी तर ओळखला जातोच. पण शाहरुख खानच्या करियरमधीलही हा महत्त्वाचा चित्रपट ठरला होता. याचं कारण म्हणजे त्यांने या चित्रपटात पहिल्यांदाच त्याचे सिक्स पॅक ऍब्स दाखवलेले. आज तो त्याच्या पिळदार शरिरयष्टीसाठी नेहमीच चर्चेत येतो, पण त्याची ही शरिरयष्टी पहिल्यांदा दिसली ती ओम शांती ओममध्येच.

हा चित्रपट दिपीका – शाहरुखसाठीच नाही तर आणखी एका गोष्टीसाठी चर्चेत आलेला. ही गोष्ट म्हणजे या चित्रपटात दिसलेले केमियो रोल. जवळपास या चित्रपटात ६० पाहूण्या कलाकारांनी हजेरी लावलेली, त्यातील ३० ते ३१ केमियो तर फक्त दिवानगी दिवानगी गाण्यातच आलेत. बरं आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगून टाकते, ते म्हणजे दिवानगी दिवानगी हे गाणं नसीब चित्रपटातील जॉन जानी जनार्दन गाण्याला दिलेला ट्रेब्यूट होता. त्या गाण्यातही अनेक स्टार्सने केमियो दिला होता.

बरं ओम शांती ओम या चित्रपटात जवळपास आर्ध्यापेक्षा जास्त फिल्म इंडस्ट्री दिसली होती. याबद्दल फराह खानने सांगितलेले की ती अनेकांना तिने भेटून किंवा फोन करून केमियोसाठी विचारलं होतं. सलमान खानने तर मला फक्त वेळ सांगा मी येईल असं तिला कळवलं होतं. त्यामुळे दिवानगी दिवानगी गाण्यात प्रियंका चोप्रा, प्रीती झिंटा, काजोल पासून रेखा पर्यंत अनेक अभिनेत्री दिसल्या आहेत, तर धर्मेंद्रपासून सैफ अली खान, अरबाज, गोविंदा असे अभिनेतेही दिसले आहेत.

पण असं असलं तरी काही असेही स्टार आहेत, ज्यांनी असा गेस्ट अपियरन्ससाठी थेट नकार दिलेला. खरंतर या चित्रपटात बॉलिवूडचे चार खान एकत्र दिसले असते. पण त्याचं काय झालं की अमीर खानने सांगितलं तो तारे जमीन पर या चित्रपटाच्या कामात व्यस्तय. आता असं म्हटल्यावर त्याला मनवणार कोण ना. तर बीग बी म्हणजेच अमिताभ बच्चनने अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या लग्नाचे कारण देत नकार दिलेला. विशेष गोष्ट अशी की अभिषेक बच्चनने मात्र या चित्रपटासाठी केमियो दिला होता. तर देव आनंद यांनी डायरेक्ट सांगितलेलं मी फक्त लीड रोल करतो, केमियो नाही. म्हणजे कसं विषयच कट ना.

आणखी एक थक्क करणारी गोष्ट म्हणजे खऱ्याखुऱ्या फिल्मफेअरच्या रेड कार्पेटवर झालेली शुटींग. झालं असं की खऱ्याखुऱ्या फिल्मफेअर ऍवॉर्डच्या फक्शनलाच फराह कॅमेरा घेऊन पोहचली. तिने रेड कार्पेटवरच स्टार्सकडून डायलॉग शूट करून घेतले होते. म्हणजे कसं सगळं एकदम खरखुरं वाटेल. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या शूटींगवेळी फराह प्रेग्नंटही होती बरं का. आणि आणखी एक त्यावेळी केवळी अभिषेकच नाही, तर अक्षय कुमार, ऋषी कपूर, सुभाष घई अशा दिग्गजांनीही स्पेशल सीन शूट केलेले बरं का.

हे सगळं जरा थक्क करणारंच आहे नाही का, बरं आता जाता जाता आणखी एक फॅक्ट सांगते ते म्हणजे १९५८ मध्ये आलेला मधूमती या चित्रपटातून प्रेरणा घेऊन ओम शांती ओमचा क्लायमॅक्स करण्यात आला होता. आता फिल्म इंडस्ट्रीबद्दलच सांगणारा हा चित्रपट होता म्हणल्यावर केमियो, अनेक नाट्यमय प्रसंग वैगरे असंणं अपेक्षितच असायला हवं नाही का?

हे देखील वाचा