×

कुरळ्या केसांच्या, सुरेल आवाज असणाऱ्या पलक मुछालच्या ‘या’ हिंदी गाण्यांनी लावले सर्वांना वेड

भारतीय संगीत क्षेत्रात अशा अनेक गायिका आहेत ज्यांनी आपल्या आवाजाने जोरदार लोकप्रियता मिळवली आहे. या यादीत प्रसिद्ध गायिका पलक मुछालच्या (palak muchchal ) नावाचा समावेश होतो. पलक मुछल ही हिंदी संगीत क्षेत्रातील प्रसिद्ध गायिका म्हणून ओळखली जाते. आपल्या जादूई आवाजाने तिने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले आहे. पलकच्या अनेक गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले आहे. तिच्या याच जादूई आवाजाचे आणि गाण्याचे देशभर असंख्य चाहते पाहायला मिळतात. या प्रतिभावान गायिकेचा जन्म ३० मार्च १९९० ला इंदोरमध्ये झाला होता. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षीच तिने कल्याणजी- आनंदजी स्पर्धेचे सदस्यत्व मिळवले होते. पलक प्रमाणेच तिचा भाऊ पलाश मुछलही गायक आहे. आज (३० मार्च) पलकचा वाढदिवस, जाणून घेऊ या तिची काही गाजलेली गाणी ज्यांनी सर्वांनाच वेड लावले आहे. 

१) कौन तुझे यु प्यार करेगा-  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जिवनावर आलेला एम.एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाने सगळीकडे वाहवा मिळवलीच. त्यासोबतच पलकचे हे सुंदर गाणेही सर्वांच्याच लक्षात राहिले. या गाजलेल्या गाण्याला टि- सिरीज स्टुडिओमध्ये रेकॉर्ड करण्यात आले होते.

२) देखा हजारों दफा – रुस्तम चित्रपटातील देखा हजारो गाण्याने तरुणाईला वेड लावले होते. पलक आणि अरजित सिंगच्या जादूई आवाजाने या गाण्याला प्रचंड प्रसिद्धी मिळवली. या गाण्याचे बोल मनोज मंतुशिरने लिहले होते, तर जीत गांगुलीने हे गाणे संगीतबद्ध केले होते.

३) चाहु मैं या ना – आशिकी २ चित्रपटातील प्रत्येक गाणे प्रेक्षकांना आवडले होते. यांपैकी पलक मुछालच्या आवाजात गायलेल्या चाहु मैं या ना या गाण्याने जोरदार प्रसिद्ध मिळवली. या गाण्याने प्रत्येक प्रेमविराला वेड लावले होते.  इरशाद कामिलने लिहलेल्या या गाण्यावर श्रद्धा कपूर आणि आदित्य रॉयची जोरदार केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

४) हुआ है आज पेहली बार – सनम तेरी कसम या चित्रपटातील हुआ है पेहली बार हे गाणे ही चांगलेच गाजले होते. या गाण्याला पलक मुछलच्या आवाज लाभला आहे. आजही हे गाणे अनेकांच्या प्ले लिस्टमधील आवडते गाणे म्हणून पाहायला मिळते. हे गाणे मनोज यादवने लिहले आहे तर अमाल मलिकने संगीतबद्ध केले आहे.

५) तेरी मेरी कहाणी – प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि करीना कपूरचा गब्बर इज बॅक चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटातील तेरी मेरी कहाणी हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले होते. या गाण्यालाही पलकचा आवाज लाभलेला आहे.  या गाण्याचे बोलही मनोज यादवने लिहले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

Latest Post