Thursday, October 22, 2026
Home › मराठी › झी स्टुडिओचा लॉकडाऊननंतरचा पहिला सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, खळखळून हसवायला ‘पांडू’ होतोय सज्ज

झी स्टुडिओचा लॉकडाऊननंतरचा पहिला सिनेमा येतोय प्रेक्षकांच्या भेटीला, खळखळून हसवायला ‘पांडू’ होतोय सज्ज

कोरोना संकटामुळे २०२० मध्ये चित्रपटगृह आणि नाट्यगृह बंद होती. त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण मराठी सिनेसृष्टीवर पडला. परंतु आता योग्य ती सावधगिरी बाळगून सिनेमांच्या शुटिंगचे काम सुरू झाले आहे. तसेच सिनेमागृह आणि नाट्यगृह हळूहळू सुरू करण्यात आली आहेत.

गुरुवारीच आनंदाची बातमी मिळाली आहे, ती म्हणजे मराठी सिनेसृष्टीतील मोठं प्रॉडक्शन हाऊस झी स्टुडिओने कोरोनानंतरच्या पहिल्या सिनेमाची घोषणा केली. झी स्टुडीओजचा पांडू हा सिनेमा थिएटरमध्ये लवकरंच प्रदर्शित होणारं आहे. निर्माते दीपक पांडुरंग राणे यांनी त्यांना ट्विटरद्वारे शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

निर्माते दीपक राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, ”पांडू येतोय तुम्हाला खळखळून हसवायला. झी स्टुडीओजने पांडू चित्रपटाची घोषणा करणं हे निर्माते, प्रेक्षकांसाठी खूप आशादायी आणि दिलासादायक गोष्ट आहे. या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसेस पुन्हा थिएटरकडे पाऊलं वळवली आहेत. ही खूप पॉझिटीव्ह गोष्ट वाटते. आपली इंडस्ट्री २०२१ गाजवायला सज्ज आहे.”

सर्वांनाच आशा लागून राहीली आहे ती सिनेमांच्या हाऊसफुल्ल पाट्यांची. आता पांडू हा सिनेमा नविन वर्षात नवं चैतन्य घेऊन येणारं यात शंकाचं नाही.

हे देखील वाचा