Sunday, September 8, 2024
Home बॉलीवूड पराग अग्रवाल बनले ट्विटरचे ‘सीईओ’, तर कंगना रणौतने उडवली जॅक डॉर्सींची खिल्ली; म्हणतेय कशी…

पराग अग्रवाल बनले ट्विटरचे ‘सीईओ’, तर कंगना रणौतने उडवली जॅक डॉर्सींची खिल्ली; म्हणतेय कशी…

ट्विटरचे सह-संस्थापक जॅक डॉर्सी यांनी सोमवारी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदाचा राजीनामा दिला. यानंतर, कंपनीने मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) पराग अग्रवाल यांची कंपनीचे नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. पराग अग्रवाल यांना ही नवीन जबाबदारी देण्यात आली. यानंतर सोशल मीडियावर बॉलिवूडची ‘पंगा क्वीन’ म्हणजेच बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने जॅक डॉर्सीची खिल्ली उडवली आहे. ट्विटर आणि कंगनाचे जुने युद्ध आठवून सोशल मीडिया युजर्स आता पोस्ट पाहून मजेदार कमेंट करत आहेत.

जॅक डॉर्सी असताना कंगनाचे ट्विटर अकाऊंट करण्यात आले होते निलंबित
ट्विटरवर तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर तिचे अकाऊंट निलंबित करण्यात आले होते. यानंतर कंगनाने एक लांबलचक पोस्ट शेअर करत जॅक डॉर्सी यांच्यावर जोरदार टीका केली. यानंतर, तिने कू ॲपवर एक खाते तयार केले आणि कूसह इंस्टाग्रामवर सक्रिय राहण्यास सुरुवात केली. आता पराग अग्रवाल यांना ट्विटरचे नवे सीईओ बनवण्यात आले, त्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर जॅक डॉर्सीला डिवचण्याची संधी सोडली नाही.

कंगना म्हणाली, ‘बाय जॅक अंकल’
कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक ट्वीट शेअर केले आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, “ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल, जे आयआयटी बॉम्बेचे माजी विद्यार्थी आहेत, सीईओ म्हणून जॅक डॉर्सीची जागा घेत आहेत.” हे शेअर करत कंगनाने जॅक डॉर्सी यांचा ‘बाय जॅक अंकल,’ म्हणत निरोप घेतला. कंगनाची ही पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे.

Photo Courtesy Instagramkanganaranaut

पराग कोण आहे ते घ्या जाणून
पराग अग्रवाल यांनी ट्विटरमध्ये इंजीनियर म्हणून करिअरची सुरुवात केली आणि आता ते सीईओ म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. त्यांनी २०१७ मध्ये कंपनीचे सीटीओ (मुख्य तंत्रज्ञान अधिकारी) म्हणून पदभार स्वीकारला. ट्विटरवर काम करण्यापूर्वी पराग यांनी एटीएँडटी लॅब्स, मायक्रोसाफ्ट आणि याहू येथे काम केले.

आयआयटी बॉम्बेमधून मिळवली इंजीनिअरिंगची पदवी
ट्विटरचे नवे सीईओ पराग अग्रवाल यांनी आयआयटी बॉम्बेमधून इंजीनियरिंगची पदवी घेतली आहे. याशिवाय त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून कॉम्प्युटर सायन्समध्ये डॉक्टरेट केली आहे. पराग अग्रवाल २०११ पासून ट्विटरवर कार्यरत आहेत आणि २०१७ पासून कंपनीचे सीटीओ म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-भयावह! ‘छोरी’ फेम नुसरतसोबत घडली विचित्र घटना, ३० सेकंदात सोडावं लागलं अभिनेत्रीला हॉटेल

-गायिका शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखसोबत बांधली लगीनगाठ, मोजक्या लोकांच्या उपस्थित केले लग्न

-अरे देवा! पुन्हा पोस्टपॉन झालं आलिया अन् रणबीरचं लग्न, काय आहे नेमकं कारण?

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा