[rank_math_breadcrumb]

आमीर खान निर्मित हे ३ येणारे चित्रपट गाजवू शकतात बॉक्स ऑफिस; सनी देओल, आमीर आणि वीर दास मुख्य भूमिकेत…

आमिर खान एक उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक उत्कृष्ट चित्रपट निर्माता देखील आहे. आमिर चित्रपटाच्या कथेशी संबंधित प्रत्येक बारीकसारीक गोष्टींकडे खूप लक्ष देतो. तसेच स्क्रिप्टच्या मागणीनुसार शूट परफेक्ट व्हावे यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसतो. त्यामुळेच त्याला बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्टही म्हटले जाते. 

‘लाल सिंग चड्ढा’नंतर आमिर खान ब्रेकवर आहे. मात्र, लवकरच तो ‘लाहोर 1947’ या चित्रपटात एका खास कॅमिओमध्ये दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती अभिनेत्याच्या प्रॉडक्शन हाऊसच्या (आमिर खान प्रॉडक्शन) बॅनरखाली होत आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. याशिवाय आमिर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती करत आहे. 

राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘लाहोर १९४७  या चित्रपटात सनी देओलसोबत प्रीती झिंटा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आमिर खान देखील या चित्रपटात कॅमिओ रोल करताना दिसणार आहे. ‘लाहोर १९४७  हा चित्रपट पुढील वर्षी म्हणजेच प्रजासत्ताक दिनी म्हणजेच २६ जानेवारी २०२५ रोजी प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटात प्रेक्षकांना जबरदस्त ॲक्शन पाहायला मिळणार आहे. आमिर खानच्या प्रोडक्शन हाऊसच्या (आमिर खान प्रॉडक्शन) बॅनरखाली हा चित्रपट तयार होत आहे.

याच बॅनरखाली बनत असलेला ‘सीतारे जमीन पर’ हा चित्रपट सध्या पोस्ट-प्रॉडक्शनच्या टप्प्यात आहे. चित्रपटाची कथा पॅरालिम्पिक खेळांवर केंद्रित आहे, ही आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा विशेषत: अपंग खेळाडूंवर केंद्रित आहे. या चित्रपटात जेनेलिया देशमुख मुख्य अभिनेत्री आहे.

आमिर खानच्या प्रोडक्शन बॅनरखाली ‘प्रीतम प्यारे’ हा चित्रपटही तयार होत आहे. खुद्द आमिर खाननेच गेल्या वर्षी याला दुजोरा दिला होता. या चित्रपटात तो पाच मिनिटांच्या कॅमिओमध्ये दिसणार असल्याचेही सांगण्यात आले.

आमिर खान प्रॉडक्शन निर्मित ‘हॅपी पटेल’ चित्रपटात वीर दास मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट सध्या जोरात सुरू असून गोव्यातील नयनरम्य ठिकाणी त्याचे चित्रीकरण सुरू आहे. या विचित्र विनोदी चित्रपटाबद्दल अशी अटकळ बांधली जात होती की यात इम्रान खान मुख्य भूमिकेत असेल पण आमिरने स्पष्ट केले होते की वीर दास या चित्रपटात मुख्य अभिनेता आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा –

पुन्हा प्रदर्शित होणार टाईमलेस क्लासिक वीर-झारा…

author avatar
Tejswini Patil