Thursday, July 18, 2024

परिणीती चोप्रा लवकरच बांधणार लगीनगाठ? ‘या’ व्यक्तीने केला तिच्या लग्नाबद्दल मोठा खुलासा

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नांचा सिझन आल्याचे चित्र दिसत आहे. राजकुमार राव, कॅटरिना कैफ, विकी कौशल आदी कलाकार लग्नाच्या बंधनात अडकत असताना इंडस्ट्रीमध्ये असे अजून बरेच कलाकार आहेत ज्यांच्या लग्नाबद्दल त्यांचे फॅन्स खूपच उत्सुक आहेत. त्यापैकी एक अभिनेत्री म्हणजे परिणीती चोप्रा. परिणीती इंडस्ट्रीमध्ये प्रियांका चोप्राची बहीण म्हणून आली, मात्र तिने तिच्या कामाने आणि अभिनयाने ती ओळख मिटवत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. आज परिणीती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. अनेकदा तिला विविध मुलाखतींमध्ये, कार्यक्रमांमध्ये तिच्या लग्नाबद्दल विचारले जाते. पण आता ती लग्न कधी करणार याचे उत्तर खुद्द निर्माता, दिग्दर्शक करण जोहरने दिले आहे.

करण जोहरने टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये लोकप्रिय होत असणाऱ्या ‘हुनरबाज’ या रियॅलिटी शोच्या मंचावर परिणितीच्या लग्नाबद्दल खुलासा केला आहे. सध्या करण जोहर, परिणीती चोप्रा आणि मिथुन चक्रवर्ती कलर्स चॅनेलवर लवकरच सुरु होणाऱ्या ‘हुनरबाज’ या शोचे परीक्षक म्हणून काम सांभाळणार आहे. नुकताच या शोचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये परिणीती आणि करण लग्नाबद्दल बोलत असतात आणि त्यातच करण एक खुलासा करून जातो.

या नवीन प्रोमोमध्ये करण म्हणतो, “मी कपल्ससाठी खूपच लकी आहे. मी खूपच जोड्या जुळवल्या आणि त्यात यशस्वी देखील ठरलो आहे.” यावर परिणीती म्हणते, “माझी जोडी तर कधी नाही जुळवली तू” यावर करण उत्तर देत म्हणतो, “पुढे बघ आता काय काय होते. तुझे पण नक्की याच वर्षी होऊन जाईल.”

यासर्व चर्चेवर कॉमेडियन भारती सिंग म्हणते, “परीला असे वाटत आहे की, कलर्सवाले तिचे लग्न ठरवून टाकतील.” पुढे भारती आणि हसरह शोमध्ये आलेल्या स्पर्धकांसोबत परिणितीचे कनेक्शन सेट करण्याबद्दल बोलतात. तर करण यावर म्हणत, “मी ठामपणे सांगू शकतो की, आज तू इथून सिंगल घरी नाही जाणार.” हा व्हिडिओ कलर्स चॅनेलने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला असून, हा विडिओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “परिणितीसाठी जोडीदार शोधणार करण. तर तो शोधू शकेल का तिचा साथीदार?” २२ जानेवारीपासून प्रेक्षकांना हा शो बघता येणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा